शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

पुणे जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार 'बाळंत विडा' किट; राज्यातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 11:37 IST

राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, महिलांचा व बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना गरोदरपणात व डिलिव्हरी झाल्यानंतर पोषण आहार न मिळाल्याने कुपोषित बालकांचा जन्म होतो. हे टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व डिलिव्हरीच्या उंबरठ्यावर असलेल्या व डिलिव्हरी झालेल्या स्तनन मातांना काळी खारीक, सेंद्रिय गुळ, काजु, शुध्द गाईचे तुप असा विविध पौष्टिक साहित्यांचा 'बाळंत विडा' किट देण्यात येणार आहे.  राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, महिलांचा व बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

ग्रामीण भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. यात गरोदर मातांची नियमित तपासणी पासून विविध आवश्यक गोळ्या औषधे देणे, कडधान्य पुरवणे आदी उपक्रम राबविण्यात येतात.  ऐवढी काळजी घेऊन देखील जिल्ह्यातील काही तालुक्यातील  कुपोषण कमी होताना दिसत नाही. यामुळेच पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गरोदर माता व डिलिव्हरी झालेल्या मातांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी ' बाळंत विडा' ही योजना घेतली आहे. यासाठी तब्बल 1 कोटी 25 लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यात सर्वसाधारण गटातील महिलांसाठी 75 लाख रुपये व मागासवर्गीय गटातील महिलांसाठी 50 लाख राखीव ठेवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागा मार्फत ही योजना राबविण्यात येत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली. ------कुपोषण कमी करणे हाच मुख्ये उद्देश जिल्ह्यातील बालकांमध्ये आजही कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. यात केवळ दुर्गम, आदिवासी भागातील बालकेच नव्हे तर सधन तालुक्यात देखील हे प्रमाण जास्त आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर महिलांना ' बाळंत विडा ' हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. - पुजा पारगे, सभापती महिला व बालकल्याण विभाग -------बाळंत विडा किटमध्ये काय-काय असणार - काळी खारीक - सेंद्रिय गुळ- खोबरे- गाईचे शुध्द तुप- काजु - शेंगदाणे - भाजकी डाळ- डिंक 

टॅग्स :Puneपुणेpregnant womanगर्भवती महिलाState Governmentराज्य सरकारHealthआरोग्य