कणेरी : श्री क्षेत्र कणेरीमठ (ता. करवीर) येथे १९ ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या भारत विकास संगमच्या चौथ्या अखिल भारतीय संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये ५० एकर क्षेत्रात पसरलेले कृषी प्रदर्शन हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. यामध्ये सुमारे १५० प्रकारची पिके पाहता येणार असून सेंद्रीय शेतीशी संबंधित अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे. या संमेलनासाठी देश तसेच जागतिक किर्तीच्या काही प्रमुखांचीही उपस्थिती राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री तसेच रामदेवबाबा, अण्णा हजारे, तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१९ जानेवारी : गाईची पूजा करून कार्यक्रमाला सुरूवात. संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शनाचे उद्घाटन. संमेलनात भाग घेणाऱ्या मुख्य समाजसेवी व्यक्ती, संस्था, कार्यक्रमाची माहिती दिली जाणार.२० जानेवारी : (कृषी उत्सव) संमेलनाचा हा दिवस कृषी व शेतकऱ्यांसाठी समर्पित असून विशेषतज्ज्ञ शेतकऱ्यांना कमी भांडवलामध्ये भरपूर, स्वास्थ्यवर्धक उत्पन्न घेण्याचे तंत्र शिकवणार आहेत. २१ जानेवारी : (वारकरी उत्सव) १ लाख वारकरी दिवसभर भजन, कीर्तन व आरती करणार आहेत. पंढरपूरचे गोलरिंंगण हे विशेष आकर्षण.२२ जानेवारी : (युवा महोत्सव) युवा पिढीने सुद्धा सात्विक जीवन जगत असताना समाज व राष्ट्रासाठी आपली भूमिका कशाप्रकारे पार पाडावी यासंबंधी काही वास्तविक उदाहरणे.२३ जानेवारी : (मातृशक्ती उत्सव) पाचवा दिवस मातृशक्तीला समर्पित. आर्थिक सुरक्षिततेबरोबर आदर्श परिवार तयार करण्याची कला, आहार-विहार परिहाराचे ज्ञान व संस्कृती रक्षणासाठी मातृशक्तीचे योगदान याविषयी विशेष कार्यक्रम.२४ जानेवारी : (आरोग्य उत्सव) या दिवशी सर्व प्रकारच्या भारतीय चिकित्सा पद्धतींचे उपचार व प्रदर्शनाबरोबर तज्ञांकडून सल्ला. २५ जानेवारी : (मंगलोत्सव) गत सहा दिवसांच्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेऊन नागरिक काय करू शकतात. याविषयी विस्तृत कार्यक्रम.स