शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

तयारी ‘आयएएस’ची

By admin | Published: February 12, 2017 12:41 AM

परीक्षेसाठी उमेदवाराचे वय २१ वर्षे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्र्गांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे असून ६ संधी उपलब्ध आहेत. इतर मागास उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असून ९

- प्रा. राजेंद्र चिंचोले

परीक्षेसाठी उमेदवाराचे वय २१ वर्षे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्र्गांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे असून ६ संधी उपलब्ध आहेत. इतर मागास उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असून ९ संधी उपलब्ध आहेत, तर अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ३७ वर्षे असून संधीची मर्यादा नाही. यासाठी उमेदवाराने मान्याताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली पाहिजे.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत मानाची, अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा (Civil Services Examination) होय. नागरी सेवा परीक्षा ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत कठीण परीक्षेपैकी एक समजली जाते. नागरी सेवा परीक्षेमार्फत IAS, IPS, IFS यासारख्या अखिल भारतीय सेवा तसेच भारतीय महसूल सेवा IRS, भारतीय पोस्टल सेवा, भारतीय रेल्वे सेवा, भारतीय आॅॅडिट सेवा, भारतीय अकाउंट सेवा यासारख्या केंद्रातल्या महत्त्वाच्या विभागातल्या उच्च श्रेणी वर्ग-१ अधिकाऱ्यांची निवड केली जाते.या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मराठी उमेदवारांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०११ पासून संघ लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल केले आहेत. नागरी सेवा परीक्षा ही संघ लोकसेवा आयोगाद्वारे ३ टप्प्यांत घेतली जाते.१) नागरी सेवा पूर्व परीक्षा२) मुख्य लेखी परीक्षा ३) नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी. उमेदवाराच्या निवडीसाठी नागरी सेवा पूर्व परीक्षेचे गुण विचारात घेतले जात नाहीत. नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या लेखी परीक्षेत मिळालेले गुण व व्यक्तिमत्त्व चाचणी म्हणजेच मुलाखतीत मिळालेले गुण यांची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते.पूर्व परीक्षेला देशातून सुमारे १० लाख उमेदवार परीक्षा देतात. त्यापैकी साधारणत: १२ ते १५ हजार उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतात. पूर्व परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. यातून साधारणत: दोन हजार ते अडीच हजार उमेदवार मुख्य लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात. एकूण पदसंख्येच्या दुप्पट उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणी म्हणजेच मुलाखतीस बोलाविले जाते. यातून सुमारे हजार उमेदवारांची अंतिम निवड के ली जाते. या वर्षाची केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा १८ जून २०१७ रोजी होणार आहे.प्रवेश अर्ज  (Union Public Service Comission) च्या वेबसाइटवर आॅनलाइन भरायचे आहेत. नागरी सेवा परीक्षेच्या तयारीत विद्यार्थ्याने पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्त्व चाचणी हे ३ टप्पे वेगळे असले तरी त्याचा अभ्यास समग्र दृष्टिकोनातूनच केला पाहिजे. योग्य संदर्भ ग्रंथांचा वापर, नियमित दर्जेदार वृत्तपत्र वाचन, योग्य दिशेने अभ्यास केल्यास प्रशासकीय सेवा क्षेत्रातील अत्युच्च संधी उपलब्ध होऊ शकते.

rjchinchole@gmail.com