शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

कोल्हापुरात नवरात्रोत्सवाच्या तयारीची लगबग

By admin | Published: September 24, 2014 1:45 AM

देवस्थान समितीच्या जवळ असणार्‍या कार्यालयात सकाळी साडेदहाला दागिन्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला

कोल्हापूर: शहरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मानदंड, मोरपक्षी, चंद्रहार, पुतळाहार, ठुशी, बोरमाळ, म्हाळुंग, पुतळ्याची माळ, सोन्याची गदा अशा अनेक प्राचीन नित्यालंकार व उत्सवालंकारांची स्वच्छता करण्यात आली. देवस्थान समितीच्या जवळ असणार्‍या कार्यालयात सकाळी साडेदहाला दागिन्यांच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. प्रारंभी देवीच्या अलंकारांचे नित्यालंकार म्हणजे रोज घातल्या जाणार्‍या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर उत्सवालंकार म्हणजे खास सणावेळी घातल्या जाणार्‍या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये माणिक हार, चौरीमोरचेल, कर्णफुले, जडावाचा किरीट, सर, नथ, चिंचपेटी, मोत्याचा हार, श्रीयंत्र हार, चंद्रकोरहार, चाफेकळी, साज, मोहनमाळ, सोन्याचे गजरे, पाचपदरी कंठी, सोळापदरी माळ, पाचपदरी माळ, देवीच्या उत्सवमूर्तीचे दागिने अशा सर्व प्रकारच्या सुवर्ण अलंकारांची आज स्वच्छता करण्यात आली. दागिन्यांच्या रखवालीचा मान असलेले महेश खांडेकर हे यावेळी उपस्थित होते. मंदिर परिसरात घालण्यात आलेली फरशी पाण्याचा फवारा मारून स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली. स्वच्छतेमुळे एकप्रकारे मंदिर परिसराला झळाळी आली आहे. अतिक्रमण हटविलेमहाद्वार दरवाजासमोरील देवीचे साहित्य विक्री करणार्‍या विक्रेत्यांनी दुकानाबाहेर आलेले साहित्य स्वत:हून आतमध्ये घेतले, तर नियमित रस्त्यावर आवळा, चिंच व विविध साहित्याची विक्री करणार्‍या छोट्या व्यापार्‍यांनीही आपले साहित्य येथून हलविले. त्यामुळे हा परिसर स्वच्छ व चालण्यास मोकळा करण्यात आला. पोलीस नियंत्रण मंडप पोलीस ठाण्याच्या आवारातनवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ हायस्कूल दरवाजासमोर दरवर्षीप्रमाणे उभारण्यात येणारा मंडप यंदा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात उभा करण्यात आला आहे. यापूर्वीच्या ठिकाणी मंडप उभारणी केल्यामुळे भाविकांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे हा विचार करून पोलीस प्रशासनाने चांगला निर्णय घेतल्याबद्दल भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. मंदिर सुरक्षेची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणीनवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा उपस्थित होते. वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरेनवरात्रोत्सवानिमित्त देशभरातून लाखो भाविक अंबाबाई दर्शनासाठी येत असल्याने गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरेही उभे केले असून, भाविकांच्या जीवितास कोणताही धोका पोहोचू नये व गर्दीवर ताबा ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.