शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

सीबीआय चौकशीला तयार

By admin | Published: May 16, 2016 2:00 AM

गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे.

जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, इतर कोणत्याही मोठ्या यंत्रणेद्वारे चौकशी झाल्यास त्याचीही तयारी आहे. या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी सांगितले.तक्रारदार डॉ. रमेश जाधव यांनी २००८-०९मध्ये जमिनीच्या मागणीसाठी शासनाकडे अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळला होता. दरम्यान त्यांनी आपल्याकडे पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यात मागील मंत्री, अधिकारी यांनी संगनमत करीत जमीन नाकारल्याचा आरोप केला. महसूलमंत्री म्हणून आपल्याला अर्ध न्यायीकचा दर्जा आहे. ही जमीन गायरानाची आहे. जमीन परिवहन खात्याकडे वर्ग केली आहे. तसेच परिवहन विभागाने या जमिनीची ५ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे भरणा केली असल्याने ही जमीन देता येत नसल्याचा निर्णय आपण २५ फेब्रुवारी रोजी दिला. हा निर्णय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार यांना कळविला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तक्रारदार यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप केला, असे खडसे म्हणाले. तक्रारदाराने सुरुवातीला १५ कोटींच्या लाचेची मागणीचा आरोप केला. नंतर ३० कोटी मागितल्याचा आरोप केला. रेडीरेकनरच्या दरानुसार ज्या जमिनीची किंमत ५ कोटी आहे. त्यासाठी ३० कोटींची मागणी होईल कशी, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. तक्रारदाराने केलेले आरोप व पूर्व इतिहास पाहता ती व्यक्ती विकृत असल्याचे लक्षात येते, असेही खडसे म्हणाले.>हे गजाननला माहीत नाहीगजानन पाटील हा आपल्या मतदारसंघातील व्यक्ती आहे. वारकरी असल्यामुळे आपल्यासोबत तो आषाढीच्या वारीमध्ये अनेकदा आला आहे. त्याची ओळख नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कोटीमध्ये किती शून्य असतात, हे त्याला सांगता येणार नाही, असेही खडसे म्हणाले.