मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर हे चौकशीसाठी केव्हाही तयार असून, ते सहकार्य करीत नसल्याचा सरकारी पक्षाचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अॅड़ रिझवान र्मचट यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात केला़ ते म्हणाले, पारसकर उद्यापासून तीन दिवस पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीला सामोरे जाऊ शकतात़ तशी परवानगी न्यायालयाने द्यावी़ न्यायालयाने मात्र केवळ उद्या शनिवारीच गुन्हे शाखेत चौकशीसाठी जाण्याचे निर्देश पारसकर यांना दिल़े
तसेच तक्रारदार मॉडेल-अभिनेत्री हिला पारसकर यांनी अटक केली होती़ त्याचा राग ठेवून तिने पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली असल्याचा युक्तिवादही अॅड़ र्मचट यांनी केला़
हा युक्तिवाद चुकीचा आह़े कारण पीडित तरुणी ही तक्रार करण्यासाठी प्रयत्न करीत होती; आणि पारसकर यांना अटक झाल्यास इतर तरुणीही अशा प्रकरणांमध्ये तक्रार करण्यासाठी पुढे येतील, असा दावा तरुणीच्या वकील चित्र साळुंखे यांनी केला़ सरकारी वकील कल्पना चव्हाण यांनीही पारसकर यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला़ यावरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आह़े
एका मॉडेल-अभिनेत्रीने पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली असून, त्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पारसकर यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आह़े (प्रतिनिधी)