शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

नवी मुंबईतल्या आंबेडकर स्मारकाच्या सजावटीचा प्रस्ताव तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 3:07 AM

ऐरोलीमधील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकामधील अंतर्गत सजावटीचा प्रस्ताव १९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नवी मुंबई : ऐरोलीमधील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकामधील अंतर्गत सजावटीचा प्रस्ताव १९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचा प्रस्ताव १० फेब्रुवारी २००९मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाला होता. प्रशासकीय मंजुरीला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्याप स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. स्मारकाच्या डोमला मोर्बल लावायचे की नाही, यावरून एक वर्ष नगरसेवक व यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामध्ये वाद सुरू होते. अखेर डोमला मार्बल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मारकाचे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होणे आवश्यक होते; पण प्रत्यक्षात विविध कारणांनी ते रखडत गेले.अनेक वेळा स्मारकाच्या उद्घाटनाच्या तारखांची घोषणाही करण्यात आली; पण प्रत्यक्षात स्मारकाचा मुख्य भाग असलेल्या अंतर्गत सजावटीचा प्रस्तावच तयार करण्यात आलेला नव्हता. स्मारकासाठी पाठपुरावा करणाºयांचेही याकडे दुर्लक्ष झाले होते. महापौर सुधाकर सोनावणे व इतर दक्ष लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर अंतर्गंत सजावटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मंगळवारी होणाºया सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.अंतर्गत सजावटीमध्ये फ्लोरिंगमध्ये किरकोळ बदल करणे, फॉल सिलिंग करणे, रंगकाम करणे, रेलिंग करणे, स्ट्रक्चरल स्टीलचे काम करणे, मॉड्युलर फर्निचर, खिडक्यांना पडदे, वातानुकूलित यंत्रणा बसविणे, स्मारकास भेट देणाºया नागरिकांसाठी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दाखविण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचा समावेश आहे. ११ कोटी ९९ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, पुढील एका वर्षात स्मारकाचे काम पूर्ण करणे शक्य होणार आहे.>आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टीभूखंडाचे क्षेत्रफळ - ५७५० चौ.मी.बांधकाम क्षेत्रफळ - २३१० चौ.मी.मुख्य हॉल - ३०० चौ.मी.कॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मी.सर्विस एरिया - १७२ चौ.मी.व्हीआयपी रूम व कार्यालय -६४ चौ.मी.पोडियम गार्डन - ८२५ चौ.मी.खुले सभागृह - ८५६ चौ.मी.प्रार्थना हॉल - ३२५ चौ.मी.वस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मी.कलादालन - १३४ चौ.मी.कॅफेटेरिया - ११४ चौ.मी.वाचनालय - ११४ चौ.मी.वॉटर बॉडी - २७५ चौ.मी.डोम - ४९ मीटर उंच>४९ मीटर उंचीचा डोम : आंबेकर स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये ४९ मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे. बाबासाहेब विद्वत्तेचे प्रतीक आहेत. यामुळे डोमचा आकार पेनाच्या नीबप्रमाणे व उमलत्या कमळाप्रमाणे ठेवण्यात आला आहे. डोमला रंग लावण्यावर मात्र प्रशासन ठाम आहे.