शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

फॅशनेबल मान्सूनची तयारी सुरू

By admin | Published: July 04, 2017 7:38 AM

प्रत्येक ऋतूचा एक साज असतो. अगदी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच जण नाही म्हटले, तरी ऋतुगणिक आपले राहणीमान, खानपान

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रत्येक ऋतूचा एक साज असतो. अगदी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच जण नाही म्हटले, तरी ऋतुगणिक आपले राहणीमान, खानपान बदलत असतात. हिवाळा असो, उन्हाळा असो, अन्यथा पावसाळा असो. फॅशन कोणत्याच ऋतूला अपवाद नसते. म्हणूनच की काय, मुंबईकर तरुणाईवर आता ‘मान्सून फॅशन’ सर झाली आहे. कपड्यांपासून बुटांपर्यंत आणि खाण्यापासून राहण्यापर्यंतचा प्रत्येक टे्रंड साजरा करत, तरुणाईने मान्सून आपलासा केला आहे. मुंबईकर कॉलेज तरुणाईची मान्सून खरेदीसाठीची झुंबड बाजारपेठांमध्ये वाढतच चालली आहे. अर्धी अधिक खरेदी झाली असली, तरीदेखील फॅशन पावलागणिक बदलते, असे म्हणतात. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईची वांद्रे येथील लिकिंग रोड आणि फोर्ट येथील फॅशन स्ट्रीटवरील खरेदीसाठीची गर्दी वाढतच आहे. नेहमीच्या छत्र्या खरेदी करण्याऐवजी, तरुणाईचा भर कलरफुल छत्रीवर आहे. शिवाय छत्रीपेक्षा रेनकोट खरेदी करण्यावरही तरुणाईचा अधिक भर आहे. एकंदर महाविद्यालय आणि मुंबईकर तरुणाईने मान्सूनला फॅशनेबल केले असून, अशाच काहीशा रंगछटा मान्सूनचा मूड आणखी द्विगुणित करण्यासाठी ‘लोकमत’ने टिपल्या आहेत. फुलांचे, भौमितिक रचनेचे डिझाइन असलेले नोजरिंग्स, ब्रोचेस, इयररिंग्सच्या खरेदीवर भर दिला जात आहे. मान्सूनमध्ये ग्राहक जास्त प्रमाणात कॅपरी, शॉर्ट पँट, टी-शर्ट, जीन्स, प्लॅस्टिक शूज, प्लॅस्टिक बॅग, फॅशनेबल छत्री, रेनक ोट, पावसाळी बॅग्सची खरेदी करत आहेत.मार्केटमध्ये नवा टे्रंड १मान्सूनमुळे मार्केटमध्ये नवा टे्रंड आला आहे. मूव्हीमधील कपडे मार्केटमध्ये आले आहेत, पण तरुणाई आपल्या पसंतीचे कपडे खरेदी करत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी विविध प्रकारचे फॅशनेबल घड्याळ, वॉटरप्रूफ वॉच, बेल्ट, बँड खरेदी करत आहेत.२मान्सून असूनही महाविद्यालयांचे विद्यार्थी वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे ग्लासेस खरेदी करताना दिसून येत आहेत. मोबाइलसाठी फॅशनेबल कव्हर, पोर्टेबल चार्जर, पावसाळ्यात गाणी ऐकण्यासाठी हेडफोन्सच्या खरेदीवर भर दिसत आहे.कपड्यांच्या खरेदीदरम्यान फुलऐवजी हाफ कपड्यांना तरुणांनी अधिक पसंती दिली आहे. नायलॉन, शिफॉन, पॉलिस्टर, सिल्कसारख्या कापडाचे कपडे खरेदी करण्यावर अधिक भर दिला जात आहे. तरुणींचा कल आॅफ शोल्डर, कोल्ड शोल्डर, स्लीव्हवॅण्स, पार्टी गाउन्सवर विशेष भर आहे. शिवाय कमी घेर असलेल्या कुर्तीच्या खरेदीवरही अधिक भर दिला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.वेगवेगळ्या प्रिंट्सचे, कलर्सचे बूट्स, रबरी स्नीकर्स, बॉक्स हिल्स, वॉशेबल स्नीकर्स यासारख्या फूटवेअरची मागणी अधिक वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, याचे मटेरिअल बदलले असून, ते मान्सूनसाठी साजेसे आहेत. मान्सूनसाठीच्या कॉलेज बॅगच्या खरेदीसाठीही झुंबड उडाली असून, आकर्षित प्रिंट्स असलेल्या बॅगखरेदीकडे तरुणाईचा कल आहे.माझ्या सोयीनुसार मी पावसाळ्यात फॅशन करतो. इतर तरुणांप्रमाणेच सँडल, रेनकोट वापरतो.- प्रशांत कांबळे, झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपरफॅशन म्हटले की, एक वेगळेपण. आपला एक नवा लूक आला. मी सतत नवेपण आणि नवा लूक शोधत असतो. पावसाळ्यात माझा लूक छत्रीपासून सुरू होत, शूजने संपतो.- अविनाश कदम, विकास नाइट कॉलेज, विक्रोळीमला पावसाळा भरपूर आवडतो. कारण पावसातून पडणारे थेंब जे आवाज निर्माण करतात, ते मला आवडतात. पावसाळ्यात मला पाश्चिमात्य कपडे परिधान करायला जास्त आवडतात. मान्सूनमध्ये सगळे रेनकोट, छत्री वापरतात, पण मी ते वापरतच नाही.- धरिणी धमेचा, मित्तल कॉलेज, मालाडविविध कपडे हा माझा आवडता फंडा. दरवर्षी पावसाळ्यात मी नवे टी-शर्ट आणि थ्री-फोर्थ घालतो. कारण पावसाळी दिवसांमध्ये ते मला फार आरामदायी आणि हटके वाटतात.- शंकर शिंदे, वझे केळकर कॉलेज, मुलुंडपावसाळ्यातील फॅशन म्हणजे, माझ्यासाठी तर मज्जाच. मी जीन्सवरती तर नेहमीच कम्फर्टेबल असतो. मात्र, पावसाळ्यात माझी फॅशन म्हणजे फक्त फिरणे, ट्रेकिंगला जाणे वगैरे.- संदीप पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थान, मुलुंडमान्सूनमध्ये वेगवेगळ्या रंगाचे प्लेन टी-शर्ट, जे लाइट कलरचे असतील, ते घालायला आवडतात, तसेच जीन्स म्हटले, तर डार्क रंगाच्या सिक्स पॉकेट जीन्स वापरायला आवडतात.- मितेश घाडी, रूपारेल कॉलेज, माटुंगापावसात मला कम्फर्टेबल वाटेल, अशी फॅशन मी करते. पावसाळ्यात रंगीबेरंगी छत्र्या वापरायला आवडतात.- एकता पालंडे, पोद्दार कॉलेज, माटुंगा (पूर्व)खरेतर साधे राहणीमान हीच माझी मुळातली फॅशन. मी फॅशनच्या बाबतीत कुठल्याही हीरोला फॉलो करत नाही. पावसाळ्यात मला टी-शर्ट वेअर करायला आवडतात. त्याचबरोबर, पावसाळ्यात थ्री-फोर्थ बरी पडते. पावसाळ्यात क्रॉप टाइप किंवा रबरी टाइप सँडल वापरायला मला जास्त आवडते.- हर्षल जाधव, साठे कॉलेज, विलेपार्लेजीन्स, शर्ट, शॉर्ट्स, लांब दांड्याची छत्री, कॉटनचे कपडे वापरतो.- लिओ मोहिते, सोमया कॉलेज, विद्याविहारजीन्स, टी-शर्ट, पावसातले शूज, सँडल व जास्त कॉटनचे कपडे यूज केले जातात.- प्राजक्ता कोरगावकर, रुईया कॉलेज, माटुंगा (पूर्व)च्संकलन : कुलदीप घायवट, प्रसाद गायकवाड आणि चेतन पाटील