ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 26 - भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पिंपरी झाली. त्यास निवडक ६८ सदस्य उपस्थित होते. यावेळी भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश, शेतकरी आत्महत्या, शिवसेनेची टीका, मध्यवधी निवडणूक, सरकारची धोरणे यावर चर्चा करण्यात आली. मध्यावधी निवडणूक लागल्यास स्वबळाची तयारी ठेवा कामाला लागा, अशाही सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.पिंपरीतील पंचतारांकित हॉटेल कलासागर येथे सकाळी सुरूवातीला भाजपातील केवळ ६८ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस निवडक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. यावेळी महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकींमधील यशाबद्दल चर्चा झाली. यावेळी भाजपाच्या ध्येयधोरणावर चर्चा, तसेच पुढील कामकाजाचे नियोजन यावर चर्चा झाली. राज्यातील शिवसेनेने पाठींबा काढून घेतल्यास मध्यावधी निवडणूक लागल्यास भूमिका काय असेल? यावर चर्चा झाली. सत्तेत असूनही शिवसेना भाजपावर टीका करते. त्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे. याबाबत आक्रमक भूमिका घ्यायला हवी. विरोधकांना अंगावर येऊ देऊ नका? त्यावेळी काहींनी देशात आणि राज्यात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी करावी. स्वबळावर निवडणूक लढवावी, अशीही चर्चा झाली. त्यावर यावर पक्षातील ज्येष्ठांशी चर्चा केली जाईल. कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करू, मध्यावधी निवडणूक लागल्यास आपण तयारीत रहायला हवे, असेही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पश्न विचारणाऱ्या सदस्यांना सांगितले. सरकारच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा? अशाही सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गावागावातील शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन चर्चा केली पाहिजे. प्रश्न जाणून घ्यायला हवेत. सरकारची शेतीविषयक धोरण कशी चांगली आहेत, याचीही माहिती दिली पाहिजे, असेही पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
मध्यावधी निवडणूक लागल्यास स्वबळाची तयारी ठेवा कामाला लागा
By admin | Published: April 26, 2017 10:47 PM