शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मोठ्या भूकंपाच्या तयारीत! अंबादास दानवे नाराज; शिंदे गटाच्या वाटेवर? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 7:56 AM

Ambadas Danve Latest News: दानवे एक-दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, विमानतळावरून माघारी फिरले...

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : आमच्याद वाद नाही, मतभेद नाहीत असे सांगत ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा एकदिलाने प्रचार करू असे सांगणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरेंना लोकसभेची उमेदवारी मिळतेय असे समजल्यावर नाराज झाले आहेत. या नाराजीतून दानवे एक-दोन दिवसांत शिंदे गटात जाण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यामुळे दानवे नाराज झाले आहेत. दानवेंनाही लोकसभा लढवायची होती. गेल्या काही महिन्यांपासून दानवे तशी वक्तव्येही करत होते. 

जिल्ह्यात खैरे-दानवे यांचे सख्य सर्वांना ठाऊक आहे. पक्ष फुटीनंतर दोघेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले असले तरी उभयतांमध्ये विस्तव जात नाही. लोकसभेसाठी खैरे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी ते कामाला लागले आहेत. खैरेंच्या उमेदवारीस दानवे यांचा विरोध आहे. ते स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, राज्यात प्रचारासाठी तुमची गरज असल्याचे दानवे यांना 'मातोश्री'वरून सांगण्यात आले. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही दानवे यांची मनधरणी केल्याचे समजते.

विमानतळावरून का फिरले?दानवे शुक्रवारी सायंकाळच्या विमानाने मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. मात्र, अचानक त्यांना 'मातोश्री'वरून बोलावणे आल्याने ते विमानतळावरूनच माघारी फिरले, दानवे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केला असल्याचे समजते.महाविकास आघाडीतील एक बड़ा नेता एक- असल्याचे सूतोवाच पक्ष प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केला. शिरसाटांचे ते विधान दानवे यांना उद्देशून असल्याची चर्चा आहे. दानवे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू समजले जातात. त्यांना खैरेंच्या विरोधात उमेदवारी मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसभेला नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मी पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. माझ्यासाठी संघर्ष नवा नाही. भविष्यात काय घडेल हे आताच सांगू शकत नाही. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना