मुंबई : सक्रिय झालेल्या मान्सूनने गुरुवारी सकाळी मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा किनारी भाग, दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा काही भाग येथे हजेरी लावली.पण मान्सून येऊनही पाऊस मात्र आला नाही. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल असून, दोन-तीन दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. २१ ते २३ जून दरम्यान, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
मान्सूनची हजेरी, पण पाऊसच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 4:37 AM