मुंबई : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला बुधवार, २० ते रविवार, २४ जानेवारीदरम्यान सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. परंतु, या कालावधीत श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येईल. सोमवार, २५ जानेवारी रोजी श्रींच्या मूर्तीचे पूजन व आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन घेता येईल, अशी माहिती मंदिर न्यासाचे उपकार्यकारी अधिकारी रवी जाधव यांनी दिली.
सिंदूर लेपनासाठी सिद्धिविनायकाचे दर्शन २० ते २४ जानेवारी बंद
By admin | Published: January 18, 2016 3:55 AM