कोल्हापूर : राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यातील १२५ कोटींच्या निधीचे वेध महापालिकेला लागले आहेत. खासगी कंपनीने केलेल्या सविस्तर विकास आराखड्याचे मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यापुढे सादरीकरण झाले. केंद्राकडे लवकरच या निधीची मागणी केली जाणार आहे.संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून साडेचार कोटी रुपयांची तांबट कमान ते रंकाळा टॉवरपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम चार वर्षांनंतर पूर्ण झाले. अद्याप निसर्गकेंद्र प्राथमिक अवस्थेत आहेत. गाळाचे परीक्षण पूर्ण झाले असले तरी तो काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविली गेली नाही. रंकाळ्यात शाम सोसायटी, देशमुख कॉलनी, सरनाईक कॉलनी, आदी नाल्यांतून सांडपाणी अजूनही थेट रंकाळ्यात मिसळते. रंकाळा जलशुद्धिकरण, निर्माल्य कुंडाचे बांधकाम, ओव्हर फ्लो कमान, आदी कामे वगळता एकही भरीव काम पहिल्या टप्प्यात झाले नाही. साडेआठ कोटी खर्च करूनही रंकाळ्याच्या दुखण्यात कसूभरही फरक पडलेला नसल्याचे चित्र असताना आता प्रशासनास सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीचे वेध लागले आहेत.दुसऱ्या टप्प्यातील ड्रेनेजलाईन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, संरक्षण कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे किंवा स्थूल ठेवण्यासाठी उपाययोजना, निर्गत पाण्याच्या व्हॉल्वची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी रोखणे, रंकाळ्याचे मजबुतीकरण करणे, आदींसाठी तब्बल राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तब्बल १२५ कोटींचा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या सादरीकरणावेळी उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, इस्टेट आॅफिसर संजय भोसले, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, उपअभियंता एस. बी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) रंकाळ्याचे संपूर्ण संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. दर तीन महिन्याला रंकाळ्याच्या पाण्यात जंतुसंसर्ग, पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी, आदी व्याधी जडतात. मूळ दुखणे सोडून डागडुजी करण्याकडेच प्रशासनाचा कल आहे.राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून पाहिजे तितका निधी रंकाळ्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.
मागील पहिल्या टप्प्यातील कामाचा हिशेब केंद्र शासनास सादर केल्यानंतरच येत्या सहा महिन्यांत हा निधी पालिकेला मिळण्याची शक्यता आहे.तांबट कमान ते टॉवरपर्यत पाईपलाईन टाकण्याचे चार वर्षांनीकाम पूर्णसाडेआठ कोटी खर्च करुनही रंकाळ्याच्या दुखण्यात कसूभरही फरक पडलेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा तयार केला आहे.