मुंबई : लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांनी सन २०१४ चा ४२ वा एकत्रित वार्षिक अहवाल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्याकडे शुक्रवारी राजभवन येथे सादर केला. या वेळी लोकआयुक्त म. ल. टहलियानी, उपलोकायुक्त डॉ. शैलेशकुमार शर्मा उपस्थित होते. या कार्यालयाकडे २०१४ या वर्षात ७ हजार नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ११४० तक्रारी या केवळ इतर प्राधिकाऱ्यांना उद्देशून होत्या, तर काही स्वाक्षरीविरहीत असल्यामुळे अपात्र ठरल्या आहेत. २०१४ या वर्षात ५,८६० नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत, तसेच मागील वर्षाच्या ४,८०७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने एकूण १०, ६६७ प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी ६,६८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, असे या अहवालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर
By admin | Published: June 05, 2016 1:15 AM