शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

महाराष्ट्राच्या लेकी देशाचा गौरव वाढवतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 8:24 AM

 मुंबई - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन ...

 मुंबई - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन तसेच 'उत्कृष्ट संसदपटू' व 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारांचा वितरण समारंभ मंगळवारी मुंबईतील विधिमंडळातील सभागृहात पार पडला. महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या मुख्य पदावर महिला अधिकारी तर पोलिस प्रशासनाच्याही प्रमुख पदावर महिला अधिकारी सक्षमपणे कार्यरत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब असून महाराष्ट्राच्या लेकी निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील, असं प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मु यांनी केलं.

ही खूप आनंदाची बाब आहे की सध्याच्या काळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेतील महिला परंपरेला पुढे घेऊन जात आहे, तसेच ही महिला उपसभापती असणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. असे गौरव उद्गार यावेळी राष्ट्रपती मुर्मु यांनी डॉ. गोऱ्हे यांच्याबद्दल काढले. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थिती होते. 

 विधानसभा उत्कृष्ट संसदपटू : (२०१८-१९)   बाळासाहेब थोरात, डॉ. संजय कुटे, (२०१९-२०) प्रकाश आबिटकर, ॲड. आशिष शेलार, (२०२०-२१) अमित साटम, ॲड. आशिष जैस्वाल, (२०२१-२२)    संजय शिरसाट, प्रशांत बंब, (२०२२-२३) भरतशेठ गोगावले, चेतन तुपे, समीर कुणावार (२०२३-२४) रमेश बोरनारे, अमिन पटेल, राम सातपुते.  उत्कृष्ट भाषण : (२०१८-१९) नरहरी झिरवाळ, पराग अळवणी, (२०१९-२०) सुनील प्रभू, दिलीप मोहिते-पाटील, (२०२०-२१) प्रताप सरनाईक, प्रकाश सोळके, (२०२१-२२) सरोज अहिरे, सिध्दार्थ शिरोळे, (२०२२-२३)  यामिनी जाधव, अभिमन्यु पवार (२०२३-२४) कुणाल पाटील, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे.

विधानपरिषद उत्कृष्ट संसदपटू : (२०१८-१९) डॉ. नीलम गोऱ्हे, निरंजन डावखरे, (२०१९-२०) सतीश चव्हाण, अनंत गाडगीळ, (२०२०-२१) प्रवीण दरेकर, विनायक मेटे, (२०२१-२२) अनिकेत तटकरे, सदाभाऊ खोत, (२०२२-२३) प्रसाद लाड, महादेव जानकर, (२०२३-२४) अमोल मिटकरी, गोपिचंद पडळकर, रमेशदादा पाटील.  उत्कृष्ट भाषण : (२०१८-१९) हुस्नबानू खलिफे, सुजितसिंह ठाकूर, (२०१९-२०) रामहरी रुपनवार, श्रीकांत देशपांडे, (२०२०-२१) डॉ. मनिषा कायंदे, बाळाराम पाटील, (२०२१-२२) गोपिकिशन बाजोरिया, विक्रम काळे, (२०२२-२३) बाबाजानी दुर्राणी, प्रज्ञा सातव, (२०२३-२४) आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सुनिल शिंदे.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूMaharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवन