शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

माफीनाम्याकरिता दबाव

By admin | Published: September 28, 2016 1:06 AM

मराठा क्रांती मूक मोर्चांची हेटाळणी करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी याकरिता शिवसेनेच्या

- संदीप प्रधान, मुंबई

मराठा क्रांती मूक मोर्चांची हेटाळणी करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी याकरिता शिवसेनेच्या मराठा खासदार व आमदारांनी दबाव टाकला असल्याचे समजते. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी तर माफी मागा, अन्यथा राजीनामा देऊ, अशी टोकाची भाषा केल्याचे कळते.पक्षाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबद्दल मंगळवारच्या अंकात माफीनामा प्रसिद्ध केला जाईल, अशी शिवसेनेतील अनेक मराठा खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात माफीनामा तर दूरच राहिला ‘व्यंगचित्राचा वाद पेटवण्यामागे समाजकंटक असल्याचा’ दावा ठळकपणे केला गेला. यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व नेते बिथरले. ठाणे येथील मोर्चाच्या संयोजनावर शिवसेनेचाच वरचष्मा असल्याने तेथील नेत्यांनी शिवसेनेची बाजू उचलून धरणारे निवेदन सोमवारी प्रसिद्धीस दिले होते. मात्र मंगळवारी व्यंगचित्राला विरोध करणाऱ्यांना समाजकंटक ठरवल्याने भडकलेल्या काही कार्यकर्त्यांनी प्रथम माफी मागा, अशी मागणी केली. मोर्चात फूट पडू नये म्हणून कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले होते. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी भलत्याच गोष्टी छापून आगीत तेल ओतले जात असल्याने कार्यकर्ते संतापले आहेत, असे निवेदन दत्ता चव्हाण, रमेश आंब्रे, अविनाश पवार, कैलाश म्हापदी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी भेट घेऊन नाराजी प्रकट केल्याचे समजते.माफीनाम्यास नकारशिवसेना खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल माफीनामा देण्यास ठामपणे नकार दिला असल्याचे कळते. आपण आयुष्यात कधीही माफी मागितलेली नाही आणि माफी मागणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना एक निवेदन प्रसिद्धीस देण्यास शिवसेनेने सांगितले. देसाई यांनी आपल्या निवेदनात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विनाकारण हा वाद वाढवत असल्याचा आरोप केला आहे.मुंबई भाजपाकडूनही संजय राऊत लक्ष्य केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपाला अनेक मुद्द्यावरून खासदार संजय राऊत हेच लक्ष्य करीत असल्याने मुखपत्रातील व्यंगचित्राच्या वादावरून भाजपानेही राऊत व पर्यायाने शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राऊत यांच्या माफीची मागणी केली आहे. मराठा मोर्चे हे भाजपा सरकारच्या विरोधात असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत निर्माण केले गेले होते व शिवसेनाही तेच चित्र जनमानसात ठसावे याकरिता प्रयत्न करीत होती. मात्र एका व्यंगचित्रामुळे शिवसेना ही मराठा समाजाच्यादृष्टीने खलनायक ठरल्याने आता भाजपाने वचपा काढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.दसरा मेळाव्यात ठाकरे करणार भूमिका जाहीरमराठा समाजाला आरक्षण देण्यास शिवसेनेचा पाठिंबा नाही. कारण शिवसेना कायम आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. मात्र अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मराठा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे. याबाबतची सविस्तर भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.