- गणेश वासनिकअमरावती : स्थावर मिळकतीच्या वाढत्या किमती आणि नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे काही व्यक्ती दस्त नोंदणीप्रक्रियेत बनावटीकरण करून दुय्यम निबंधकांची दिशाभूल करतात; मात्र आता नव्या उपाययोजनांमुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, तशा सूचना राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी दिल्या आहेत.स्थावर, जंगम मालमत्तांची खरेदी-विक्री करताना बरेचदा बनावट तथ्यांचा, कागदपत्रांचा, व्यक्तींचा वापर होत असल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा उघडकीस आले आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे, पोलिसांत तक्रार आदी बाबीदेखील वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे महसूल विभागाने दस्त नोंदणीप्रक्रियेतील बनावटीकरण रोखण्यासाठी खरेदी नोंदणी अधिनियम, १९०८ चे कलम ८२ च्या योग्य व प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना केल्या आहेत. दस्त नोंदणी बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास दुय्यम निबंधकांना थेट फौजदारी गुन्हा दाखल करता येणार आहे. तसेच दस्त नोंदणी प्रक्रियेदरम्यान होणाºया कामकाजात वा चौकशीत खोटे विधान, कथन करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असे नव्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. नोंदणी अधिनियम, १९०८ चे कलम २१ खंड ४ मधील तरतुदीनुसार ज्या दस्तऐवजामध्ये मिळकतीचा नकाशा, आराखडा समाविष्ट असेल, त्या दस्तासोबत नकाशा, आराखड्याची सत्यप्रत सादर करणे अनिवार्य राहील. दस्त नोंदणीत बनावटीकरण रोखण्यासाठी दुय्यम उपनिबंधक कार्यालयाच्या दर्शनी भागात माहिती फलक लावण्याच्या सूचना राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या आहेत....तर केव्हाही होईल चौकशीदस्त नोंदणीनंतर ती बनावट असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित दुय्यम निबंधक याप्रकरणी चौकशी करू शकतील, असे नव्या परिपत्रकात नमूद आहे. बनावट कागदपत्रे किंवा खोटी विधाने करण्याबाबतची तक्रार आल्यास रीतसर व सर्वंकष चौकशी करून दोषींंवर फौजदारी दाखल होईल.खोटे कबुलीजबाब दिल्यास गंभीर गुन्हादस्त नोंदणीप्रक्रियेत दुसरीच एखादी व्यक्ती दुय्यम निबंधकांपुढे हजर राहत असल्यास, तिला आता नोंदणी अधिनियम, १९०८ चे कलम २१ खंंड ४ नुसार तोतया, बनावट ठरवून त्याला कारागृहाची हवा खावी लागेल, हे विशेष.
दस्त नोंदणी प्रक्रियेतील बनावटीकरण रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 4:30 AM