पाण्याअभावी अद्रकाची आवक कमी झाल्याने औरंगाबादेत क्विंटलमागे ३ हजार रुपयांनी अद्रकाचे दर वाढले आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे अन्य फळभाज्यांचे भावही हळहळू वाढू लागले आहेत.औरंगाबाद जिल्हा अद्रकाचा गड मानला जातो. मध्यंतरी देशभरातून अद्रकाची मागणी घटली होती. भाव घटून ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्वंटल अद्रक विक्री झाले; मात्र पावसाने मोठा खंड दिल्याने अनेकांनी अद्रकाची लागवड कमी केली. परिणामी, आठवडाभरात ३ हजार रुपयांनी भाववाढ होऊन शुक्रवारी ८५०० ते ९ हजार रुपये प्रतिक्विं टलपर्यंत अद्रक विक्री झाले; मात्र मागणीअभावी ७०० ते १५०० रुपये क्विं टलने लसणाची विक्री होत आहे. नवीन कांदा ठोकमध्ये ५ ते ७ रुपये, तर जुना कांदा ८ ते १२ रुपये किलोेने विकत आहे. बटाटा ठोक बाजारात १६ ते १७, तर किरकोळ विक्रीत २५ रुपये प्रतिकिलो आहे.
अद्रकाचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 11:15 AM