- विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. 29 - शेतक-यांचे पिक बाजारात येण्यास सुरूवात होताच शेतमालाचे भाव
पडले आहेत. हमीभावापेक्षाही एक ते दीड हजार रूपये कमी दराने व्यापा-यांनी
शेतमालाची खरेदी करून शेतक-यांची अक्षरशा लूट चालविली आहे. आठ
दिवसांपूर्वी ५१०० असलेल्या मुगाचे भाव ४ हजारांवर आले आहे.
सहा महिन्यांपासून शेतमालाच्या वाढत्या भावामुळे महागाईचा डांगोरा
पिटण्यात येत होता. मात्र, एक महिन्यापूर्वी गगनाला भिडलेले शेतमालाचे
भाव कृषी माल बाजारात येण्याला सुरूवातच होताच गडगडले आहेत. गत तीन
वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात कमालिची घट झाली होती.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यावर्षी विदर्भात चांगला पाऊस
झाल्याने शेतमालाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
यावर्षी चांगले उत्पन्न होईल अशी अपेक्षा करीत असलेल्या शेतक-यांच्या
आशेवर शेतमालाचे भाव पडल्याने पाणी फेरल्या गेले आहे. शासनाने जाहीर
केलेल्या हमीभावापेक्षाही एक ते दीड हजार रूपये कमी भाव शेतमालाला मिळत
आहे. २१ आॅगस्ट रोजी मुगाचे भाव ५ हजार ते ५१०० रूपये प्रतिक्विंटल होते.
मुगाच्या भावात एकाच आठवड्यात हजार रूपयांनी घट आली असून २९ आॅगस्ट रोजी
४ हजार ते ४३०० रूपये हमीभाव मिळत आहे. यासोबतच हरभ-याच्या भावातही
प्रचंड घट झाली आहे. ३१ जुलै रोजी हरभ-याचे भाव ७ हजार ते ७४०० रूपये
प्रतीक्विंटल होते. २९ आॅगस्ट रोजी यामध्ये अडीच हजार रूपयांनी घट झाली
असून ५ ते ५ हजार रूपये प्रती क्विंटल हरभºयाला भाव मिळत आहे. तसेच
सोयाबिन, गहू, मका व ज्वारीच्या भावातही घट झाली आहे.
शेतमालाचे भाव पडण्याकरिता शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत आहे.
शेतकरी दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शासनाच्या धोरणाचा बळी ठरणार आहे.
शेतक-यांना शेती करू द्यायची नाही व ही शेती मल्टीनॅशनल कंपन्यांच्या
घशात जातील, हे शासनाचे धोरण आहे.
- गजानन अमदाबादकर
शेतकरी नेते.
शेतमाल ३१ जुलै २०१६ २९ आॅगस्ट १६
(रूपये प्रती क्विंटल) (रूपये प्रती क्विंटल)
हरभरा ७ हजार ते ७४०० ४ हजार ते ५०००
मूग ५ हजार ते ५१०० ४ हजार ते ४३००
तूर ७००० ते ७३०० ४००० ते ५०००
सोयाबिन ३२०० ते ३३०० ३३०० ते ३५००
गहू १८०० ते २००० १५०० ते १८००
ज्वारी १३०० ते १५०० १४०० ते १६००