शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

किंमत १२,८३५ कोटींनी वाढली

By admin | Published: August 31, 2016 5:26 AM

आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या किमती वाढल्याची टीका भाजपाचे नेते विरोधी पक्षात असताना करीत होते.

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या किमती वाढल्याची टीका भाजपाचे नेते विरोधी पक्षात असताना करीत होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर मागच्याच सरकारचे धोरण पुढे राबवत देवेंद्र फडणवीस सरकारने प्रकल्पांची किंमत प्रचंड वाढल्याची एकप्रकारे कबुली देत विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पास आज सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. या प्रकल्पाची किंमत गेल्या १० वर्षांत १२ हजार ८३५ कोटी रुपयांनी वाढली असल्याने एकूण १८ हजार ४९४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंत्रिपरिषदेच्या आजच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २००५-०६ मध्ये या प्रकल्पाची किंमत ५ हजार ६५९ कोटी रुपये इतकी होती. हा राष्ट्रीय प्रकल्प असून त्यासाठी ९० टक्के निधी केंद्र सरकार तर १० टक्के राज्य सरकार देते. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत केवळ ३७२ कोटी रुपये होती. ती आज १८ हजार ८३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या दहा वर्षांत प्रकल्पाची किंमत १२ हजार ८३५ कोटी रुपयांनी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. निव्वळ दरवाढीमुळे ३५५५ कोटी, भूसंपादन दरातील वाढीमुळे १९७४ कोटी, संकल्पचित्रातील बदलामुळे १६४६ कोटी, अतिरिक्त भौतिक प्रकल्प घटकांमुळे ३०६७ कपटेल पुनर्वसन पॅकेज आदींमुळे १४९० कोटी, आस्थापना आणि संबंधित खर्चापोटी ८६४ कोटी तसेच मागील काळात दिलेल्या जादा दराच्या निविदा अशा कारणांमुळे ही वाढ झाली आहे. या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ८०० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.प्रकल्पातील अनियमिततांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत असलेली चौकशी यापुढेदेखील सुरू राहील. तसेच मेंढीगिरी आणि वडनेरे समितीच्या चौकशी अहवालानुसार सुरू असेली कार्यवाहीदेखील सुरूच राहील, असे महाजन यांनी स्पष्ट केले.