नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तब्बल ६५७ ट्रक, टेंपोची आवक झाली. अचानक आवक वाढल्याने होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव गडगडले. होलसेल मार्केटमध्ये कोबी ६ ते ८ व फ्लॉवर ५ ते ७ रुपये किलो दराने विकला जात होता. हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी राज्यभर संप पुकारला असून आंदोलन सुरू असतानाच भाव गडगडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होवू लागले असून शासनाने हमीभावाचे दिलेले आश्वासन खोटे ठरू लागले आहे. ३ जूनला समितीमध्ये कृषी मालाचे भाव अचानक वाढले. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो ३६ ते ४०, कोबी १६ ते २४ व फ्लॉवर २४ ते ३० रुपये किलो दराने विकला जात होता. बुधवारी अचानक मार्केटमध्ये ६५७ ट्रक, टेंपोची आवक झाली व बाजारभाव गडगडले. कोबी, फ्लॉवरचे दर तीन पट कमी झाले असून टोमॅटोच्या दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दुपारनंतरही शेतकऱ्यांच्या मालाची पूर्णपणे विक्री झाली नाही. यामुळे शिल्लक माल गुरुवारी अजून कमी भावाने विकावा लागणार आहे. संपामुळे परराज्यातून आलेल्या मालाला चांगला भाव मिळाला. परंतु राज्यातील शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात करताच परत भाव गडगडले आहेत. होलसेल मार्केटमध्ये भाव कमी झाले असले तरी किरकोळ विक्रेत्यांकडून लुबाडणूक सुरूच आहे. किरकोळ मार्केटमध्ये ८० ते १०० रुपये किलो दराने भाजीपाला विकला जात आहे.वस्तू३ जून ७ जूनटोमॅटो३६ ते ४०९ ते १३कोबी१६ ते २४६ ते ८फ्लॉवर२४ ते ३०५ ते ७कारली१४ ते २४२२ ते २४वांगी१६ ते २८१० ते २४ढोबळी मिरची४० ते ५०२२ ते २६भेंडी३० ते ३४२६ ते ३०शेवगा२८ ते ३६१८ ते २२तोंडली२६ ते ३६१२ ते ३४टोमॅटो३६ ते ४०९ ते १३
नवी मुंबईत बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले
By admin | Published: June 08, 2017 6:29 AM