शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

कांद्याला प्रतिकिलो दीड रुपया दर

By admin | Published: April 27, 2016 2:13 AM

मागणीपेक्षा उत्पादन वाढल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत.

बारामती : मागणीपेक्षा उत्पादन वाढल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत. कांद्याला सध्या फक्त दीड रुपया ते साडेसहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर मिळत आहे. उत्पादन खर्चदेखील त्यातून मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदाचाळीत साठवण केली आहे. या हंगामातील कांदा ओला असल्यामुळे सडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बारामती, इंदापूर तालुक्यात उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उन्हाळ्यात कांद्याचे दर तेजीत असतात. परंतु, यंदा नेमकी उलटी परिस्थिती आहे. गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चदेखील मिळत नाही. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक ६९९ क्विंटल होती. बाजारभाव कमीत कमी १५० ते ६५० क्विंटल होता, अशी माहिती बाजार समितीचे सहायक सचिव प्रदीप निलाखे यांनी दिली. कांद्याला दर कमी मिळत असल्यामुळे कांदाचाळीत साठवणूक करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.(प्रतिनिधी)