येवला (नाशिक) : येथील बाजार समिती अंतर्गत येणाºया अंदरसूल बाजारात बुधवारी कांद्याला विक्रमी दोन हजार रुपये तर येवल्यात १,९०० रुपये भाव मिळाला.१० जुलैला मध्य प्रदेश सरकारने हमीभावाने कांदा खरेदी बंद केली. शिवाय देशात राजस्थान, गुजरात, आसाम राज्यात पुरामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आहे. आॅगस्टच्या मध्यापर्यंत कांद्याला किमान तीन ते साडेतीन हजार रु पये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता आहे.
कांद्याला दोन हजारांचा भाव, येवल्यात विक्रम; अजून वाढ होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:43 AM