शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

जळगावच्या बाजारात डाळींच्या दरात २०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:49 AM

बाजारगप्पा : ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे असेच शेतकरी आपला माल बाजारात आणून विकून मोकळे होत आहेत.

- अजय पाटील   (जळगाव)

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात उडीद व मुगाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उडीद-मुगाच्या शेंगांमध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जळगावच्या बाजारात येणाऱ्या आवकमध्ये मोठी घट दिसून येत आहे. सण-उत्सव सुरू असतानाच बाजारात डाळींची आवक घटल्याने त्यांच्या दरात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. 

गेल्या आठवड्यात मूग डाळींचा दर ६,४०० ते ६,६०० रुपये प्रतिक्किंटल इतका होता. सध्या मूग डाळींचा दर दोनशे रुपयांनी वाढला असून, ६,६०० तो ७,००० रुपये इतका झाला आहे. उडदाचा दर ५,४०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. भाव वाढल्याने शेतकरी माल बाजारात आणतील, अशी शक्यता होती. मात्र, भाव वाढले असले तरी ज्या प्रमाणात मालाची आवक वाढायला हवी होती, तितकी आवक बाजारात दिसून येत नाही. उडीद-मुगामधील ओलाव्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. डाळींचा दर्जादेखील चांगला असल्याने दर वाढले आहेत. 

शहरातील बाजार समितीमध्येदेखील आवक घटली असून, उडदाची आवक २ हजार क्विंटल तर मुगाची आवक ७०० क्विंटल इतकी आहे. पितृपक्ष संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, पुढे दिवाळी आहे. त्यादरम्यान, डाळींच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. तूर डाळीच्या दरातदेखील प्रतिक्विंटल १५० रुपयांची, तर चना डाळीतही २०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली आहे. डाळींव्यतिरीक्त गहू व तांदळाचे दर स्थिर आहेत. मात्र, दिवाळीपर्यंत मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. 

सध्या बाजारात सोयाबीनची आवकदेखील कमी आहे. आॅक्टोबर महिन्यात सोयाबीन काढण्यास सुरुवात होते. मात्र, अद्याप बाजारात सोयाबीनची आवकदेखील वाढलेली नाही. सध्या २,८०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल इतके सोयाबीनचे भाव आहेत. त्यामुळे भावात वाढ होईल या अपेक्षेने शेतकरी आपला माल बाजारात आणत नसल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे असेच शेतकरी आपला माल बाजारात आणून विकून मोकळे होत आहेत.

शासकीय उडीद-मूगखरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतरदेखील खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. अनेक शेतकरी हे केंद्र सुरू होईल याच अपेक्षेने आपला माल बाजारात आणत नसल्याचेदेखील दिसून येत आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील का? असा सवाल केला जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गव्हाच्या भावात ५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली आहे. १४७ गहू २,४०० ते २,५०० रुपयांवरून २,४५० ते २,५५० रुपये प्रतिक्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २,३५० ते २,४५० रुपये, शरबती गहू २,५५० ते २,६५० रुपये आणि चंदोसीचे भाव ३,६५० ते ३,८५० रुपयांवर पोहोचले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र