शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

अमरावतीत भाऊगर्दी, यवतमाळात प्रतिष्ठा पणाला लागली

By admin | Published: August 14, 2014 1:18 AM

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी, मातब्बर राजकारण्यांच्या यवतमाळमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला, तर महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित

माणिकराव ठाकरेंची परीक्षा गणेश देशमुख - अमरावती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी, मातब्बर राजकारण्यांच्या यवतमाळमध्ये प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला, तर महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडाचे निशाण आतापासूनच फडकू लागले आहेत. माजी राष्ट्रपती पुत्राचा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आठपैकी काँग्रेसचे चार, अपक्ष तीन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. काँग्रेसची ताकद या जिल्ह्यात पूर्वीपासूनच जशी मोठी, भांडणेही तशीच टोकाची! या निवडणुकीतही हा मुद्दा आहेच. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अमरावती, मेळघाट, तिवसा आणि चांदूररेल्वे यापैकी अमरावतीत माजी राज्यमंत्री सुनील देशमुखांची एन्ट्री झाल्यास लढत चुरशीची होणार हे निश्चित़ बडनेऱ्यात घमासान होईल. राष्ट्रवादीतून निष्कासित करण्यात आलेल्या संजय व सुलभा खोडके यांच्या अस्तित्त्वाची लढाई या मतदारसंघात आहे. अचलपूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी दावेदारीसाठी आमनेसामने उभी ठाकली आहे. येथेही उष्ण वारे वाहतील. तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर आणि चांदूररेल्वेतून वीरेंद्र जगताप यांना तगडे प्रतिस्पर्धी विरोधी पक्षात दिसत नाहीत. नवेच्छुकांना हे दोन्ही मतदारसंघ म्हणूनच विशेषत्त्वाने खुणावत आहेत. दर्यापूरचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अभिजित अडसूळ यांच्या अनुसूचित जाती या राखीव मतदारसंघातही तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी नाही. आदिवासीक्षेत्र असलेल्या मेळघाटात केवळराम काळे यांच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचे चित्र आहे़ यवतमाळात प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला!राज्यभरातील काँग्रेसची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यवतमाळचे. पूर्वीचा दारव्हा, आताचा दिग्रस हा त्यांचा मतदारसंघ. २००४ मध्ये माणिकरावांना पराभूत करून शिवसेनेचे संजय राठोड दारव्ह्यातून निवडून आले होते. दिग्रसचे विद्यमान आमदार संजय राठोडच आहेत़ २००९ सालची निवडणूक माणिकरावांनी लढविली नव्हती. पक्षावर घराणेशाहीचा आरोप होत असला तरीही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांचे चिरंजीव राहुल यांचे पुनर्वसन करण्यासाठी दिग्रस किंवा यवतमाळ मतदारसंघ हवा आहे. या मतदार संघात दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत नंदीनी नीलेश पारवेकर या निवडून आल्या होत्या. त्यांचा उमेदवारीचा पत्ता कापणे सोपे नाही. यवतमाळमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत; परंतु कार्यकारिणी नाही. ६० वर्षांत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेतील सत्ता गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. यवतमाळात एकूण सात मतदारसंघांपैकी पाच काँग्रेस, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आहे ती संख्या राखता आली तरी माणिकरावांनी कमविले, अशी एकूण स्थिती आहे. विरोधी पक्ष बळकट नाहीत. संजय राठोड शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पक्ष वाढविण्याच्या भानगडीत आपण संपू नये याची दक्षता बाळगून त्यांनी पक्षकार्य केलेले आहे. पश्चिम विदर्भात सर्वाधिक लाल दिवे याच जिल्ह्यात आहेत. शिवाजीराव मोघे आणि मनोहरराव नाईक हे मंत्रिमंडळात आहेत. वसंत पुरके हे विधानसभेचे उपसभापती आहेत. असे असले तरी आगामी निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे खरे !