लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी ४:३० वाजता येथील नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात वर्धा-कळंब या ३९ किमी ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा शुभारंंभ होणार आहे. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता वितरित केला जाणार आहे.
या प्रकल्पांचे होणार लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब या नव्याने साकारलेल्या ३९ किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होईल. अमळनेर-आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाइन (३२ किमी) व प्रवासी रेल्वेचा शुभारंभ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तथा बळीराजा जलसंजीवनी योजना या अंतर्गत विदर्भ व मराठवाडा क्षेत्राकरिता सिंचन योजनांचे लोकार्पण होईल, तसेच वरोरा-वणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० चे चौपदरीकरण, साकोली-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी प्रकल्प आणि सालई खुर्द-तिरोरा महामार्ग क्र. ७५३ प्रकल्पाचे लोकार्पण होईल.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पुतळ्याचे अनावरण nयवतमाळ शहरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याचे अनावरणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. nआयुष्मान भारत योजनेअंतर्गत एक कोटी नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ होईल. nपीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना वितरण होईल.