- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नागपुरात दाखल होत आहेत. याबाबत टिष्ट्वट करताना मोदी यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जोडल्या गेलेल्या पवित्र दीक्षाभूमीवर जाऊन आपण प्रार्थना करणार आहोत. मोदी यांनी म्हटले आहे की, नागपुरात अनेक विकासकामांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. या विकास योजनांत आयआयटी, आयआयएम, एम्स आणि कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचाही समावेश आहे. त्यानंतर मोदी एका सभेलाही संबोधित करणार आहेत. मोदी यांनी म्हटले आहे की, डिजिधन मेळ्याच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहोत. डिजिधन व्यापार योजना व लकी ग्राहक योजनेच्या विजेत्यांना बक्षीस वितरीत करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील मजबूत, समृद्ध आणि सर्वसमावेशक भारत बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राष्ट्रपती शनिवारी महाराष्ट्रात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे शनिवार, १५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून अहमदनगर येथील आर्म्ड कॉर्प्स सेंटर अॅण्ड स्कूलला प्रेसिडेंट स्टँडर्ड प्रदान करणार आहेत.