शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पंतप्रधानांनी आता दुसरी मागणी मान्य करावी - अण्णा हजारे

By admin | Published: November 09, 2016 4:46 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 9 -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा  रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 'पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय हा क्रांतीकारक आहे. त्याबाबात त्यांचे अभिनंदन करायला हवे. मोदींनी टाकलेले पाऊल हे चांगले असून त्यामुळे काळा पैसा बाहेर येईल, आणि देशाची प्रगती होईल',असे सांगत अण्णा हजारे यांनी मोदींचे कौतुक केले आहे.  
 
याआधी आम्ही देशहितासाठी 500 आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घाला, अशी मागणी केली होती, असंदेखील अण्णांनी यावेळी नमूद केले. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी मोदींना आता दुसरी मागणी मान्य करायलादेखील सांगितले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या देगणीचे ऑडीट करावे, अशी मागणी हजारे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. राजकीय पक्ष  20 हजारवरील हिशेब देत नाही, देणग्यांचे 20 हजाराचे टप्पे करुन,  बनावट नावे देऊन काळा पैसा पांढरा करतात. निवडणूक आयोगाने या देणग्यांचं स्पेशल ऑडीट करावं, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. 
 
दोन हजार नोटांत गडबड होण्याची शक्यता आहे, हा व्यवहार गरीब करत नाही, त्यामुळे पुन्हा काळा पैसा तयार होण्याची शक्यता आहे, यावर पुन्हा विचाराची करण्याची गरज असल्याचेही अण्णांनी सांगितले आहे.  दोन हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक व्यवहार रोख करावे त्यावरील व्यवहार चेकद्वारे करावे. त्यामुळे काळ्या पैशाला ब्रेक लागेल, असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे.