शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर विभागाचा छापा

By admin | Published: December 26, 2016 8:36 PM

संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सोमवारी जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला.

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 26 - नोटाबंदीनंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सोमवारी जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या 23 शाखांची तपासणी प्राप्तिकर विभागामार्फत सुरू झाल्याचे समजते.प्राप्तिकर विभागाच्या सात अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी दुपारी दीड वाजता बँकेत दाखल झाले. त्यांनी अचानक बँकेशी संबंधित नसलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले. अधिकाऱ्यांना तातडीने सर्व कागदपत्रे एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. तपासणीला सुरुवात झाल्यानंतर बँकेभोवती पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. येणाऱ्या-जाणाऱ्यांना अटकाव केला जात होता. दिवसभर या पथकाने तपासणी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या 15 दिवसांत नाबार्डनेही तपासणी केली होती. प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, सावळज, कडेगाव, विटा, मिरज मार्केट यार्ड, सांगली मार्केट यार्डसह 16 शाखांची तपासणी केली होती. याशिवाय अन्य तालुकास्तरीय शाखांचीही तपासणी करण्यात आली होती. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या एकूण 19 शाखा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. नाबार्डच्या पथकाने याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. दोन टप्प्यात ही तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल आयकर विभागालाही दिला होता. ज्या खातेदारांनी एक लाखाहून अधिक रकमेचा भरणा खात्यात केला आहे, अशा सर्व खातेदारांची यादी वित्तीय आसूचना एककनेही (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) मागविली आहे. 20 डिसेंबर रोजी याबाबतची यादी जिल्हा बँकेने संबंधित खात्याकडे पाठवून दिली. अशा सर्व स्तरावर तपासण्या झाल्यानंतर आयकर विभागाने छापा टाकला आहे. नाबार्डने 10 डिसेंबर रोजी ज्यावेळी जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेतून जुन्या नोटांबाबतची माहिती घेतली, त्यावेळी 19 शाखांमधील जमा झालेल्या रकमा प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्या. या एकोणीस शाखांपैकी सर्वात जास्त उलाढाल असलेल्या सहा शाखांची तपासणी सुरुवातीच्या टप्प्यात झाली होती.जुन्या नोटांबाबततच चौकशीजुन्या नोटा स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने तीन दिवस चालविली. याच कालावधित मोठ्या प्रमाणावर नोटा जमा झाल्याचा संशय नाबार्डने व्यक्त केला होता. जिल्हा बँक अध्यक्षांनी, असे कोणतेही संशयास्पद व्यवहार बँकेत झाले नसल्याचे सांगितले होते. तरीही नाबार्ड आणि वित्तीय आसूचना कार्यालयाने बँकेच्या खात्यांची तपासणी केली.