सांगली/आष्टा : ‘किडनी रॅकेट’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी याच्या बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील घरावर अकोला पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. अर्धा तास घराची झडती घेण्यात आली. यामध्ये कोळीचा पासपोर्ट, तसेच अन्य काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.गेल्या महिन्यात अकोला पोलिसांनी किडनी रॅकेटचे प्रकरण उघडकीस आणले. सुरुवातीला दोन संशयितांना पकडले होते. त्यांच्या चौकशीतून ‘रॅकेट’चा मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी याचे नाव पुढे आले होते. कोळी अकोला पोलिसांना शरण आला होता. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. तो श्रीलंकेला जाऊन आल्याचे स्पष्ट झाले आहे.गरजू आणि गरिबांना आमिषशिवाजी कोळीने गरजू आणि गरीब लोकांचा शोध घेऊन त्यांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून किडनी दान करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्याने आतापर्यंत किती जणांच्या किडनी दान करवून घेतल्या आहेत, यामध्ये सांगली जिल्ह्णातील किती लोकांचा समावेश आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.
शिवाजी कोळीच्या घरावर छापा
By admin | Published: December 14, 2015 2:26 AM