नाशिक : जुन्या चलनातील पाचशे व एक हजारांच्या बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे याच्या खोलीतून दोन स्कॅनर, प्रिंटर, छपाईचा कागद, शाई तसेच कागद कट करण्यासाठीचे कटर जप्त केले आहे़नागरेसह इतर १० संशयितांच्या मुंबई, पुणे, नाशिकमधील घरांची झडती पूर्ण झाली असून, त्यामध्ये विशेष पुरावे हाती लागले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. खुटवडनगरमधील एका खोलीत या बनावट नोटा छापून त्या कमिशन एजंटांना हातीशी धरून बदलण्यात येत असल्याचेही तपासात समोर आले.पोलिसांनी गुरुवारी संशयित छबू नागरे, रामराव पाटील -चौधरी, रमेश पांगारकर यांसह ११ संशयितांना अटक करून १ कोटीच्या बनावट नोटा आणि चलनातील जुन्या नोटा, तीन कार, मोबाइल जप्त केले होते़ (प्रतिनिधी)
नागरेच्या घरातून नोटा छपाईचे साहित्य जप्त
By admin | Published: December 26, 2016 4:22 AM