राजेश शेगोकार, बुलडाणालग्नानंतर त्याला किंवा तिला एचआयव्हीची लक्षणे दिसली तर संसार धोक्यात येतो. त्यामुळे लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी केली तर भविष्यात निर्माण होणारे वादळ थांबविणे शक्य आहे़ हे ध्यानी घेऊनच बुलडाणा जिल्ह्यात ग्रामचळवळ उभी राहत आहे. येथील ३० ग्रामपंचायतींनी ‘आधी एचआयव्ही चाचणी, मगच लग्न’ असा ठराव ग्रामसभेमध्ये घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.खामगाव तालुक्यातील लाखनवाडा ग्रामपंचायतीने सर्वात आधी हा पुरोगामी ठराव घेऊन प्रबोधनाचे पाऊल टाकले. गावाचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.गावात लग्न ठरल्यानंतर वधू-वर दोघांसाठी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा, कदमपूर, मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर, बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी, चिखली तालुक्यातील दिवठाणा, पेठ, कोलारा, अंचरवाडी व मुंगसरी या ग्रामपंचायतींनीही अशाच स्वरूपाचे ठराव घेतले आहेत. यानिमित्ताने बुलडाणा जिल्हा आपले वेगळेपण सिद्ध करीत आहे.लग्नानंतर अवघ्या वर्षभरात एचआयव्हीमुळे संसाराची, विशेषत: महिलांची फरफट होत असल्याची अनेक प्रकरणे आमच्यासमोर आली. म्हणूनच लग्नासाठी कुंडली पाहण्यापेक्षा एचआयव्ही चाचणी करण्यासाठी आग्रही असले पाहिजे. याबाबतआम्ही विनंती केल्यावर सर्वच ग्रामपंचायतींनी असा ठरावघेण्यास संमती दिली.
लग्नाआधी ‘एचआयव्ही चाचणी’ची ग्रामचळवळ!
By admin | Published: December 14, 2015 2:38 AM