पुणे : मी शिक्षण मंत्री आहे, शिक्षक मंत्री नाही. वेतनवाढ हवी असेल तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, असे सांगितल्यामुळे माझ्याविरोधात गेले काही दिवस मोर्चे निघत आहेत. मात्र, वेतन आयोग, वेतन वाढ याआधी शिक्षणासंदर्भातील निर्णयांना आधी प्राधान्य दिले जाईल', अशी स्पष्टोक्ती राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने सदाशिव अमरापूरकर स्मृति सोहळ्यात तावडे बोलत होते. यावेळी दिगदर्शक मधुर भांडारकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सुनंदा अमरापूरकर यांची विशेष उपस्थिती होती.
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ नेपथ्यककार बाबा पारसेकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा यावेळी तावडे यांनी केली. १६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू 90 व्याा वर्षात पदार्पण करत असल्यानिमित्त त्यांना सर्वांंनी उभंे राहून मानवंदना दिली.
तावडे म्हणाले, 'काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे कळत असल्याने मुख्यमंत्र्यानी मला सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. तरीही सगळ्यांना तावडेंचे वावडे आहे.'