अमरावती, दि. 10 - मेळघाटात ज्या गावांमध्ये व्हिलेज इको टुरिझम कमिटी अस्तित्वात आहे, त्या गावांत आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत करार अंतिम टप्प्यात आहे. करार होताच गावागावांत पोल्ट्री फार्म युनिटचे जाळे उभारले जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.मेळघाटात व्याघ्र संवर्धन काळाची गरज असून सोबतच आदिवासींच्या उपजीविकेसाठी रोजगार हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाने जनविकास योजनेंतर्गत आतापर्यंत पाचशे आदिवासी युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. आदिवासींसाठी राबविल्या जाणा-या योजना ह्या कागदावरच राहायला नको, याची काळजी घेतली जात आहे. मेळघाटात लवकरच पोल्ट्री फार्म युनिटची संकल्पना पूर्णत्वास येणार आहे. यापूर्वी हॉटेल मॅनेजमेंट, इलेक्ट्रिशियन, वातानुकूलित यंत्र दुरुस्ती, शिवणकाम, वेल्डिंग प्रशिक्षण तर आॅटोमोबाईल प्रशिक्षणातून आदिवासी युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.व्हिलेज इको टुरिझम अंतर्गत १८ ते ३४ वर्षे वयोगटातील आदिवासी युवक-युवतींसाठी ह्यप्रथमह्ण नामक संस्थेच्या माध्यमातून निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प १६ हजार रुपये खर्च करीत आहे. प्रशिक्षणाअंती रोजगारासाठी पाठविलेल्या आदिवासी युवक, युवतींबाबतची माहिती घेण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.आदिवासी महिला तयार करताहेत लाखेच्या बांगड्यामध्य प्रदेशातील बालाघाट येथील सी.के.लाख युनिटसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार आदिवासी महिलांना लाखेच्या बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. बांगड्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य एजन्सी पुरवीत असून बांगड्या खरेदी करण्याची जबाबदारीदेखील याच एजन्सीकडे आहे. आतापर्यंत २२९ आदिवासी महिलांनी प्रशिक्षण घेतले असून, त्या घरबसल्या लाखेच्या बांगड्या तयार करून रोजगार मिळवीत आहेत.
मेळघाटात आदिवासींसाठी रोजगाराचे जाळे, पोल्ट्री फार्म युनिट उभारणीला प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 8:11 PM