शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री

By admin | Published: June 23, 2016 6:43 PM

सर्वांसाठी घरे-2022 योजनेतून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत सर्वांना परवडणारी घरे बांधण्यासाठी विकासकांना येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - सर्वांसाठी घरे-2022 योजनेतून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत सर्वांना परवडणारी घरे बांधण्यासाठी विकासकांना येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील. त्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या प्रश्नांवर विचारविनियम करण्यासाठी बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.बैठकीस गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन, रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, कौन्सिलचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कौन्सिलचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सर्वांसाठी घरे-2022 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पांतर्गत येत्या पाच वर्षात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्‍याचे नियोजन आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने पुढाकार घ्यावा. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास शासन प्राधान्य देईल. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी-सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जातील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातंर्गत गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी देणे, मुंबई व कल्याण-डोबिंवली महानगरपालिका हद्दीत मोकळ्या जागांवर कर आकारणीची पद्धत, इमारतींच्या बांधकामाच्या उंचीवर लावण्यात आलेले निर्बंध, 70 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींसाठी असणाऱ्या अटी व शर्ती, गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या सोप्या करणे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातंर्गत व प्राधिकरणाबाहेर सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधतांना प्राधिकरणाची भूमिका, जमीन अकृषिक करण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणणे या कौन्सिलने मांडलेल्या प्रश्नांबाबत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.