अहमदनगर : कोपर्डीच्या आरोपींसंदर्भात जिल्हा कारागृह अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा पीए, पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांच्या नावे फोन करून तोतयागिरी करणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़. रविवारी रात्री पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून अमित जगन्नाथ कांबळे (२१ रा़ नवी पेठ, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले़ तुरुंगात गेल्यानंतर, आजारपणावर सरकारी खर्चातून उपचार होत असल्याने अधिकाºयांना बनावट फोन करून अटक करवून घेतो, अशी कबुली कांबळे याने दिली आहे़. दोन्ही किडन्या निकामी झाल्याचा दावा करीत चार दिवसांनी डायलेसिस करावे लागते़. त्यासाठी पैसे नाहीत, असे त्याने सांगितले. २९ नोव्हेंबरला कोपर्डी खटल्यातील दोषींना जिल्हा न्यायालयात फाशीची शिक्षा झाल्यानंतर येरवडा कारागृहात हलविण्याची प्रशासनाची तयारी सुरू होती़ सायंकाळी अमित याने जिल्हा कारागृहात तीन वेळा वेगवेगळ््या नावांनी फोन केला होता.पोलीस आयुक्तांनाही फोनअमितने २०१० मध्ये पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नावाने फोन करून शिवीगाळ केली होती़ त्याला अटक झाली होती़ पुण्यात दांडेकर पुलावर पाणी आल्याचे सांगत, त्याने अग्निशमन दलास खोटी माहिती दिली होती. बनावट फोन करण्यासाठी तो जस्ट डायलवरून शासकीय कार्यालयांचा नंबर घेऊन फोन करतो़जामीन नाकारलातोतयागिरी करण्याच्या गुन्ह्यात आरोपीला तत्काळ जामीन मिळतो़ अमित याने मात्र जामीन घेण्यास नकार दिला. वृत्तपत्र वाचून कोपर्डी खटल्याविषयी व निकालाविषयी माहिती मिळाली़ पुन्हा काही काळ तुरुंगात जाण्यासाठी बनावट फोन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले़
उपचारासाठी जातो तुरुंगात!, मुख्यमंत्र्यांच्या तोतया पीएची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 5:47 AM