काँग्रेसच्या 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुखांसह....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 10:45 PM2019-10-01T22:45:32+5:302019-10-01T22:54:02+5:30
काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती.
शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँगेसने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून तर अमित देशमुख यांना लातूर शहरमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीतही काँग्रेसने धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विलासरावांचे दोन्ही चिंरजीव यंदा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत.
काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर, दुसऱ्या यादीतही दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. दुसऱ्या यादीनुसार कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सांगलीतून पृथ्वीराज पाटील आणि लातूर ग्रामीणमधून धीरज विलासराव देशमुख यांना निवडणुकांच्या रणांगणात उतरवले आहे.
काँग्रेसच्या 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुखांसह दिग्गज मैदानात pic.twitter.com/FQCXJz5ve5
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2019