ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 03 - फक्त विरोधासाठी म्हणून विरोध होऊ नये असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केलं आहे. विधेयकावर चर्चा, उत्कृष्ट भाषण झाली आहेत.पण फक्त विरोधासाठी विरोध होऊ नये. आधीचे सत्ताधारी विरोधात असतात आणि मग आधी तुम्ही विरोध केला म्हणून ते विरोध करतात, हे चूकीचे आहे. असे व्हायला नको असं पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत. यामुळे काही चांगली विधेयक राहून जातात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
संविधान लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानालागोंधळ अभिप्रेत नाही. गोंधळ नसेल तर काम होतात, रात्रीपर्यंत काम होतात असंही पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत.