ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - मुंबईतील दादर स्टेशन परिसरात एका खासगी बसचा अपघात झाला असून या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, दादर स्टेशनजवळील टीटी परिसरात एक खासगी बस पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटून अपघात झाल्याची घटना घडली. रत्नागिरीहून बोरीवलीकडे जात असताना रस्त्यावरील दुभाजकावर धडक बसल्याने या बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील 35 प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. तसेच, जखमी प्रवाशांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...