शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

खासगी प्रवासी वाहतुकदारांची 'दिवाळी लूट'

By admin | Published: October 21, 2016 9:57 PM

प्रत्येक वर्षी सणासुदीत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या भाडेवाढ करुन चांगलाच गल्ला मिळवतात. यंदा दिवाळीनिमित्त खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून कोणताही विचार न करता १00 टक्के भाडे वाढविण्यात आले आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ - प्रत्येक वर्षी सणासुदीत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या भाडेवाढ करुन चांगलाच गल्ला मिळवतात. यंदा दिवाळीनिमित्त खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून कोणताही विचार न करता १00 टक्के भाडे वाढविण्यात आले आहे. मुंबई ते नागपूर एसी स्लीपरचे भाडे हे सर्वाधिक असून ते २,५00रुपयांपर्यंत तर कोल्हापूर, जळगाव, औरंगाबादचा प्रवास १,५00 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महत्वाची बाब म्हणजे महाबळेश्वर आणि गोवासारख्या पर्यटनस्थळी जाण्यासाठीचा प्रवासही चांगलाच महागला. हे भाडे पाहता एसटीचा प्रवास स्वस्त ठरत आहे.

खासगी वाहतुकदारांकडून भाडेवाढीची अंमलबजावणी २२ आॅक्टोबरपासून लागू केली जात आहे. भाडेवाढ २ नोव्हेंबरपर्यंत असेल. कमी गर्दीच्या काळात खासगी टॅव्हल्सना जास्त प्रवासी मिळत नाहीत. हे पाहता तिकीटांचे दर अल्प ठेवले जातात. मात्र सणासुदीत गर्दीचा काळ सुरु होताच आयती संधी साधत प्रवास भाड्यात भरमसाठ वाढ केली जाते. तीच संधी दिवाळीत साधण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकदारांनी नॉन एसी बसच्या प्रवास भाड्यात ३00 रुपयांपासून ते ६00 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. एसी स्लीपरचे प्रवास भाडे हे ६00 रुपये ते १,३00 रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. .....खासगी बसचे भाडेमार्ग कमी गर्दीतील भाडे दिवाळीतील भाडे (गर्दीचा काळ)मुंबई ते नागपूर एसी स्लीपर बस १,२00 ते १,५00 रुपये २,५00 रुपयेमुंबई ते औरंगाबाद,सातारा एसी स्लीपर बस ६00 रुपये १,३00 ते १,५00 रुपयेमुंबई ते कोल्हापूर, जळगाव, सांगली, एसी स्लीपर ६00 ते ७00 रुपये १,३00 ते १,५00 रुपये मुंबई ते औरंगाबाद एसी स्लीपर ६00 रुपये १,३00 रुपये मुंबई ते महाबळेश्वर एसी स्लीपर ६00 ते ६५0 रुपये १,२00 ते १,३00 रुपयेमुंबई ते गोवा एसी स्लीपर ८00 रुपये १,५00 रुपयेमुंबई ते कोल्हापूर, जळगाव, सांगली नॉन एसी सीटर ३00 ते ४00 रुपये ८00 ते ९00 रुपयेमुंबई ते महाबळेश्वर नॉन एसी सीटर ५00 रुपये ८00 रुपयेमुंबई ते औरंगाबाद नॉन एसी सीटर ३00 रुपये ६00 ते ७00 रुपयेमुंबई ते नागपूर नॉन एसी बस ६00 ते ६५0 रुपये १,000 रुपये...........................महाबळेश्वरला व्होल्वोला जाताना आता प्रवाशांना एक हजार रुपये ते १,१00 रुपये मोजावे लागतील. तर कमी गर्दीच्या काळात याच मार्गावर प्रवास करताना फक्त ५00 रुपये मोजावे लागतात. ..........................तरीही एसटीचा प्रवास स्वस्तसणासुदीत किंवा उत्सवात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाडेवाढ करून चांगलीच कमाई केली जाते. ही बाब हेरून मागील वर्षापासून दिवाळीत हंगामी भाडेवाढ एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. साध्या व रातराणीसाठी १0 टक्के, निमआरामसाठी १५ टक्के आणि शिवनेरी एसी सेवांसाठी २0 टक्के भाडेवाढ लागू केली आहे. मात्र ही भाडेवाढ करुनही एसटीचा प्रवास् स्वस्तच ठरत आहे. (प्रवास भाडे रुपयांत)मार्ग साधी रातराणी निमआराम शिवनेरीमुंबई ते कोल्हापूर ४५९ ५१0 ६५३ १,३00मुंबई ते सातारा ३१३ ३६९ ४४८ --मुंबई ते नाशिक २२२ २६२ ३१७ --मुंबई ते जळगाव - ५९९ --- --मुंबई ते औरंगाबाद -- ५२५ ६३४ १,३११मुंबई ते सांगली ४६६ ५५१ ६६३ --