शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

खासगी शाळांचा आज बंद

By admin | Published: July 04, 2016 4:59 AM

राज्यातील सर्व खासगी शिक्षण संस्थांच्या सर्व शाळा सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती’ने जाहीर केला

मुंबई : राज्यातील सर्व खासगी शिक्षण संस्थांच्या सर्व शाळा सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती’ने जाहीर केला आहे. पुणे येथील निर्धार लढा मेळाव्यात कृती समितीने हा सामूहिक निर्णय घेतल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.पाटील म्हणाले की, ‘समितीने शिक्षण आयुक्त कार्यालयावर आणि अधिवेशन काळात झोपमोड आंदोलन, घंटानाद आंदोलन अशी वेगवेगळी आंदोलने केली; शिवाय मोर्चेही काढले. या आंदोलनांची दखल घेऊन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक बोलावून सर्व विषयांवर चर्चा करू, असे आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत बैठकीसाठी शिक्षमंत्र्यांना वेळ मिळालेला नाही. याउलट अनेक चुकीचे व अशैक्षणिक निर्णय शिक्षणमंत्र्यांकडून घेतले जात आहेत.’‘शासनाच्या चुकीच्या निर्णयांविरोधात कृती समितीने पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला, ठाणे, नाशिक या ठिकाणी विविध संघटनांच्या विभागीय बैठका घेतल्या. त्यानंतर पुणे येथे निर्धार लढा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्या शासनाने तत्काळ सोडवाव्यात, यासाठी एक दिवसीय शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला,’ असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश अध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले.समितीच्या महत्त्वाच्या मागण्याघोषित शाळांना प्रचलित नियमांनुसार पात्र टप्पा अनुदान तत्काळ द्यावे. सर्व खाजगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम राखावी. सन २००४-०५पासूनचे थकीत वेतनेतर अनुदान पूर्वीप्रमाणे सर्व शाळांना त्वरित देण्यात यावे. २८ आॅगस्ट २०१५चा शाळांमधील संच मान्यतेच्या संदर्भातील शासननिर्णय रद्द करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून त्यानुसार तत्काळ पदभरती सुरू करावी. प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकपद असलेच पाहिजे. शिक्षक भरतीस परवानगी देऊन भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू करावी. प्राथमिक शाळेत लिपिक व सेवकांची पदे मान्य करावीत, असे समितीचे म्हणणे आहे.१ नोव्हेंबर २००५पूर्वी सेवेत असलेल्या व त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. कला व क्रीडा शिक्षकांबाबत अतिथी शिक्षक भरतीचा शासन आदेश त्वरित रद्द करून नियुक्त्या पूर्वीप्रमाणेच व्हाव्यात. २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या रकमेचा परतावा शाळांना त्वरित मिळवा. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांचे प्रमाण मोठे आहे, म्हणून महाराष्ट्रासाठी वेगळा शिक्षण कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)...तर १६ जुलैपासून बेमुदत बंदएक दिवसीय बंद पाळल्यानंतरही दोन आठवड्यांत शासनाने बैठक बोलावली नाही, तर १६ जुलैपासून राज्यभरातील सर्व शाळा बेमुदत बंद पुकारतील. दरम्यानच्या काळात शासनाने सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन कृती समितीने केले आहे.