भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही : पियुष गोयल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 03:21 PM2019-10-18T15:21:55+5:302019-10-18T18:17:35+5:30

देशात आणि राज्यात मोदी आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार नसलेले सरकार दिले आहे.

Privatization of Indian Railways will never happen: Piyush Goyal | भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही : पियुष गोयल 

भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही : पियुष गोयल 

Next

पुणे : मागील सरकारने व त्यांच्या नेत्यांनी देशहित सोडून ते पक्षहित पाहिले. त्यांच्या काळात देशातील व्याजदर, ऊद्योग यांची काय अवस्था काय होती हे वेगळे सांगायला नको. सरकारने आरबीआयकडून पैसे घेतले. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. तसेच भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही. कारण ती देशाची संपत्ती आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले आहे..
    विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल हे पुण्यात आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. गोयल पुुढे म्हणाले, आम्ही महागाई वित्तीय तूट कमी केली म्हणून तर लोकांनी भाजपा सरकारला परत निवडून दिले. ५ ट्रिलियन मधील १ ट्रिलियन महाराष्ट्राचा असेल. निवडणुक एकतर्फी सुरू आहे. लोकांचा उत्साह पाहिला की हे दिसते. मला आश्चर्य वाटते ते मनमोहनसिंग यांचे त्यांनी देशाला ज्या लाचारीच्या अवस्थेत सोडले होते, त्यानंतर आता देश किती बदलला, समर्थ झाला हे त्यांच्यासारख्या मोठ्या अर्थतज्ञाला कसे समजत नाही. त्यांच्या काळात किती भ्रष्टाचार झाला. त्यांच्या डोळ्यासमोर किती घोटाळे झाले, पण त्यांनी काही केले नाही. 
    तसेच अभिजीत बॅनर्जी हे डाव्या विचारांचे आहे.लोकांनी त्यांना नाकारले आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो परंतु, त्यांचे विचार भारतात चालत नाहीत. अटल आहार योजना करता येणे शक्य नाही. देशात आणि राज्यात मोदी आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार नसलेले सरकार दिले आहे. आता कुठे काश्मीर से कन्याकुमारी देश एकत्र झाला.
............

Web Title: Privatization of Indian Railways will never happen: Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.