सोपान पांढरीपांडे ।नागपूर : यवतमाळची प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण, त्यामुळे परंपरागत कापूस आधारित अर्थव्यवस्था यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात आणणे शक्य होणार आहे.यवतमाळ जिल्ह्याचे मोठे दुर्भाग्य म्हणजे या जिल्ह्यात राज्याचा २५ टक्के कापूस पिकतो; परंतु कापसाचे मूल्यवर्धन करणाºया सूतगिरण्या नसल्यामुळे यवतमाळची ओळख देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत १४४ आत्महत्या झाल्या.राज्य सरकारने विविध भागांचा समतोल विकास साधण्यासाठी जी इंटर रिजनल कमिटी (आयआरसी)च्या अहवालानुसार २०१५-१६ साली राज्यात कापसाचे उत्पादन ८० लाख गासड्या झाले. त्यापैकी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१.२१ लाख गासड्या कापूस पिकला. दुर्दैवाने यवतमाळ जिल्ह्यात फक्त दोन सूतगिरण्या असून त्यापैकी प्रियदर्शिनी गिरणी बंद आहे. पुसदनजीकची बाबासाहेब नाईक सूतगिरणी रडतखडत सुरू आहे. या बिकट स्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील कापसावर इचलकरंजी, कोल्हापूर, भिवंडी तसेच आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश व गुजरातमधील सूतगिरण्या चालत आहेत. विदर्भात १९७०पूर्वी १३ कॉम्पोझिट कापड गिरण्या होत्या. त्या सर्व २००० सालापर्यंत बंद पडल्या. त्यामुळे प्रियदर्शिनी सूतगिरणीचे अध्यक्ष व ‘लोकमत’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा हे या गिरणीला सुरू करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वित्त व वस्त्रोद्योग विभागाच्या उच्चाधिकाºयांना अनेक वेळा भेटले आहेत व बराच पत्रव्यवहारही झाला आहे.
विदर्भातील कापसासाठी प्रियदर्शिनी सुरू होणे जरुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:55 AM