प्रियंका चतुर्वेदींचं प्रमोशन; शिवसेनेकडून 'उपनेते'पदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:26 PM2019-04-27T17:26:09+5:302019-04-27T17:27:03+5:30
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गैरव्यवहार केल्यानंतर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे प्रियंका यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
मुंबई - मथुरा लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश करून १५ दिवसही झाले नसताना प्रियंका यांचे प्रमोशन झाले आहे. शिवसेनेकडून प्रियंका यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गैरव्यवहार केल्यानंतर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे प्रियंका यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर प्रियंका शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय झाल्या आहेत.
शिवसेनेकडून उपनेतेपद मिळाल्यानंतर प्रियंका यांनी आनंद व्यक्त केला. तसेच उद्धव यांच्याकडून पक्षात मोठी जबाबदारी मिळाल्यामुळे प्रियंका यांनी आभार मानले. काही महिन्यांपूर्वी प्रियंका यांनी राफेलच्या मुद्दावर काँग्रेसकडून मथुरेत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी प्रियंका यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गैरव्यवहार करण्यात आला होता. याची तक्रार त्यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे केली होती. त्यानंतर संबंधीत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी ही कारवाई मागे घेण्यात आली होती. यामुळे नाराज झालेल्या प्रियंका यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता.
Shiv Sena has appointed Priyanka Chaturvedi as the "Upneta" of the party. (File pic) pic.twitter.com/kDe5KlfXHq
— ANI (@ANI) April 27, 2019
या संपूर्ण प्रकरामुळे व्यथीत झालेल्या प्रियंका यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रियंका यांचा जन्म मुंबईत झालेला आहे. मात्र त्या उत्तर प्रदेशातील मथुरेतील रहिवासी आहेत. त्या वाणिज्य शाखेतून पद्वीधर आहेत. त्यांनी २०१० मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. २०१३ मध्ये त्यांना काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आले होते.