शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

हरभऱ्याचे उत्पादन भरघोस होणार ; रब्बी पेरणीने गाठली सरासरी  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 5:50 PM

राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर

ठळक मुद्देज्वारी, तेलबियांचे उत्पादन घटणार

पुणे : रब्बीने सरासरी क्षेत्राचा आकडा गाठला असला तरी ज्वारी आणि तेलबियांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. तर, हरभऱ्याच्या क्षेत्रात सरासरीच्या दीडपट वाढ झाल्याने, भरघोस उत्पादन होईल. गव्हाची देखील सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर असून, ५६ लाख १३ हजार २३५ हेक्टरवरील (९८.६० टक्के) पेरणीची कामे झाली आहेत. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवली होती. तर, मराठवाडा आणि विदर्र्भ आणि मध्यमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. परिणामी राज्यात निम्म्या क्षेत्रावर देखील पेरणी होऊ शकली नाही. यंदा सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने रब्बीने सरासरी गाठली आहे. ज्वारीच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून,१८ लाख ४८ हजार ७७६ हेक्टरवर (६९ टक्के) पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी दुष्काळामुळे अवघ्या १२ लाख ४६ हजार ३४२ हेक्टरवर ज्वारीच्या पेरण्या होऊ शकल्या होत्या. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, पैकी ११ लाख १० हजार १६६ हेक्टरवर (१०९ टक्के) पेरणी झाली आहे. हरभºयाच्या क्षेत्रात यंदा चांगली वाढ झाली आहे. हरभºयाचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, त्यात २२ लाख ५१ हजार ७ हेक्टरपर्यंत (१५१ टक्के) वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा हरभºयाचे भरगोस उत्पादन होईल. करडई, जवस, तीळ, सूर्यफूळ या तेलबियांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६१ हजार ७९३ हेक्टर असून, त्या पैकी ३९ हजार ४४६ हेक्टरवर (२४ टक्के) पेरणी झाली आहे. गेली काही वर्षे ज्वारी आणि तेलबियांच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेती