राजरत्न सिरसाट/अकोला : फळ विकत घेणे ऐकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे..घरात कोणी आजारी पडले तर फळ दिसायचे. आता सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढल्यामुळे घरोघरी फळांचा वापर वाढला आहे; पण या फळात रसायन, विषारी कीटकनाशकांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचे दुरगामी परिणाम होत आहेत. यावर मात करण्यासाठी अकोला जिल्हय़ात सेंद्रिय (बायोडायनॅमिक)केळी उत्पादनावर भर दिला जात असून, राज्यातील केळी उत्पादकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. जिल्हय़ातील बाश्रीटाकळी येथील शेतकरी राजू इनामदार व विलास महल्ले यांनी प्रत्येकी दोन एकरावर (बायोडायनॅमिक) सेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादनाला सुरुवात केली आहे. या केळीची नैसर्गिक चकाकी आणि गोडवा बघता,या केळीला प्रचंड मागणी वाढल्याने त्यांना या दोन एकरात जवळपास पाच लाख पन्नास हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.यावर्षी या शेतकर्यांनी पंचाग तिथीनुसार दोन एकरात ग्रँड-९ या जातीच्या केळीची बायोडायनॅमिक पद्धतीने लागवड केली आहे.यासाठी त्यांनी जीवामृत आणि तरळ खाद्य वापरू न शेतावरच बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार केले आहे. या खताचा १0 ते १२ दिवसानंतर ठिबक पद्धतीने ( ड्रेचिंग)हे खत दिले जाते. रोग, किडीचे नियंत्रण करण्यासाठी याच किडीचा वापर केला जात आहे. सेंद्रिय पद्धतीने फळ उत्पादन केल्याने नागरिकांना विषमुक्त केळी तर उपलब्ध झालीच शिवाय उत्पन्नही भरघोस मिळाल्याने जिल्हय़ातील नव्हे तर विदर्भातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेटी देत आहेत. *केळी घडाचे वजन ३८ किलोसेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादन घेतल्याने केळीच्या घडाचे वजन ३८ किलो वाढले आहे. केळी लागवडीसाठी इनामदार व महल्ले यांनी दोन एकरात ३५00 टिश्यू कल्चर केळी लागवड केली.यासाठी त्यांना प्रतिनग १३ रुपये द्यावे लागले.इतर मशागत कपोस्ट कल्चर, दिव्यशक्ती ऊर्जा, इत्यादी मिळून प्रतिझाड केवळ ३९ रुपये मिळून दोन एकरला १,३६000 हजार रुपये खर्च झाला.*दोन एकरात सहा लाख ६५ हजारांचे उत्पन्न या दोन या शेतकर्यांनी प्रती झाड १९0 रुपये या प्रमाणे त्यांना ६ लाख ६५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.म्हणजेच २ लाख २४ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला.या सेंद्रिय केळीची माहिती घेण्यासाठी बाश्रीटाकळी येथे खान्देशसह राज्यातील शेतकरी भेटी देत आहेत.
अकोला जिल्हय़ात सेंद्रिय केळीचे उत्पादन!
By admin | Published: December 15, 2014 11:35 PM