ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): राज्यात तीळ उत्पादनाचे क्षेत्र ३.७९७ लाख हेक्टर असून, तिळाच्या तुलनेत शेंगदाण्याचे उत्पादन दुप्पट म्हणजे ६.६११ लाख हेक्टर झाले आहे. यावर्षी तिळाचे उत्पादन घटले असून, बाजारातही तिळापेक्षा शेंगदाण्याची आवक ५0 टक्क्यांपेक्षा जास्त आहे; त्यामुळे मकर संक्रातीच्या पर्वावर तीळगुळात शेंगदाण्याचा वापर करण्याकडे महिलांचा कल असल्याने 'तीळगुळ' ऐवजी 'शेंगदाणा गुळ' ही नवी संकल्पना तयार होत आहे. 'तीळगुळ' म्हटलं की प्रत्येकालाच मकर संक्रात आठवते. बाजारात मकर संक्रातीच्या पर्वावर तीळ खरेदी करण्यासाठी ग्राहकांचीही मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढते; परंतू गत पाच वर्षापासून तिळाच्या उत्पादनाकडे शेतकर्यांनी पाठ फिरविल्याने राज्यात तीळाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटत आहे. राज्यात सुमारे ३.७९७ लाख हेक्टर क्षेत्रावर तिळाचे उत्पादन घेतले जाते. त्यापासून 0.७७५ लाख मेट्रीक टन उत्पादन मिळून तिळाचे उत्पादन २0५ प्रति हेक्टर होते. हे पीक राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा व नांदेड जिल्ह्याच्या काही भागात अर्ध रब्बी हंगामातही घेतले जाते. जळगाव, धुळे, लातूरबरोबरच पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात तीळाचे उत्पादन घेतात. विदर्भाच्या काही भागात हे पीक उन्हाळ्यातसुद्धा घेतले जाते. तिळाचे सलग पीक अथवा मिश्रपीक घेतात. खाद्यतेलाव्यतिरिक्त मसाला, रेवडी यासाठी तिळाचा उपयोग होतो. त्यापेक्षाही मकरसंक्रातीला तिळगुळासाठी तिळाची सर्वाधिक मागणी होते; परंतू तिळाचे उत्पादन घटल्याने बाजारातही तिळाची आवक कमी प्रमाणात दिसत आहे. तीळ उत्पादनाच्या तुलनेत शेंगदाण्याचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. राज्यातील ६.६११ लाख हेक्टर क्षेत्रावर शेंगदाण्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये राज्यात ५.९९९ लाख टन उत्पादन शेंगदाण्याचे होत आहे. बाजारात तिळाच्या तुलनेत शेंगदाण्याची आवक ५0 टक्के जास्त असल्याने महिला मकर संक्रातीच्या पर्वावर तीळ घेण्याऐवजी शेंगदाण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे मकर संक्रातीमधील 'तीळ गुळ' ही संकल्पना 'शेंगदाना गुळ' मध्ये परिवर्तीत होत आहे.व-हाडात ७२५ हेक्टरवर तीळपश्चिम वर्हाडातील शेतकर्यांनी तीळ उत्पादनाकडे पाठ फिरवल्याने तीळाचे उत्पन्नात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. खरीप हंगामात पश्चिम वर्हाडातील अकोला जिलत ७१0 हेक्टर क्षेत्रावर तीळ पिकाचे उत्पन्न घेण्यात आले आहे. बुलडाणा जिलत केवळ १0 हेक्टर क्षेत्रावर तीळ पीक घेण्यात आले आहे. सर्वात कमी वाशिम जिलत केवळ ५ हेक्टर क्षेत्रावरच तीळ पिकाचे उत्पन्न घेण्यात आले आहे. पश्चिम वर्हाडात केवळ ७२५ हेक्टर क्षेत्रावरच तीळ पीक घेतल्याने बाजारात तिळाचा तुटवडा जाणवत आहे.
राज्यात तिळाचे उत्पादन घटले
By admin | Published: January 15, 2016 1:54 AM