शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

दुष्काळामुळे राज्यात ऊसाचे उत्पादन घटणार :  प्राथमिक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 1:42 PM

राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे अगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल.

ठळक मुद्देसाखरेच्या उत्पादनात होणार ४२ लाख टनांनी घट गेले दोन हंगाम राज्यात विक्रमी साखर उत्पादन साखर उत्पादनात ६५ लाख टनापर्यंत होऊ शकते घट कारखान्यांनी विजेतून मिळवले १ हजार कोटी 

पुणे : राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे आगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल. त्यामुळे साखर उत्पादनात ६५ लाख टनापर्यंत घट होऊ शकते. म्हणजेच नुकत्याच संपलेल्या हंगामापेक्षासाखरेच्या उत्पादनात ४२ लाख टनांची घट होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आगामी ऊस हंगामाचा अंदाज आणि नुकत्याच संपलेल्या हंगामाची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गेले दोन हंगाम राज्यात विक्रमी साखर उत्पादन होत आहे. राज्यात २०१७-१८ या हंगामात ९५२.६० लाख टन ऊस गाळपातून विक्रमी १०७.१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ९५२.११ लाख टन ऊस गाळपातून १०७.२० लाख टन साखर उत्पादित करुन गेल्या वेळचा विक्रम मोडला गेला. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात फारसा पाऊस झाला नाही. तसेच, परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून, वळवाचा पाऊस देखील झाला नाही. त्यामुळे चाºयासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस जात आहे. अजूनही राज्यात मॉन्सून सक्रीय झालेला नसल्याने चाºयासाठी आणखी ऊस तोडला जाऊ शकतो. दुष्काळी स्थितीमुळे राज्यात २०१९-२० या हंगामासाठी ५७० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. राज्याचा सरासरी साखर उतारा साडेअकरा टक्का आहे. त्यामुळे यंदा ६४.४१ लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर पडणारा पाऊस, चाऱ्यासाठी झालेली तोड याचा विचार करुन पुढील अंदाज जुलै-ऑगस्टमधे वर्तविण्यात येईल. -----------------

कारखान्यांनी विजेतून मिळवले १ हजार कोटी राज्यात ५९ सहकारी आणि ५२ खासगी कारखान्यांमधे सहविज प्रकल्प आहेत. यातून कारखान्यांनी गेल्या हंगामात २२१.१३ कोटी युनिट्स विज निर्मिती केली. त्यातील ४७.९६ कोटी युनिट विज स्वत:साठी वापरली असून, १४६.१७ कोटी युनिट्स विज निर्यात केली. त्यातून १ हजार ४१ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न कारखान्यांना मिळाले.  --------------------कारखान्यांचे साडेचारशे कोटी महावितरणकडे थकीतराज्यातील साखर कारखान्यांनी पुरवठा केलेल्या विजेचे तब्बल साडेचारशे कोटी रुपये राज्य विद्युत वितरण कंपनीकडे (एमएसइडीसीएल) थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली. --------------

राज्यातील उत्कृष्ट कारखाने 

कारखान्याचे नाव             पहिला                दुसरा            तिसरा    ऊस गाळप            जवाहर सहकारी-कोल्हापूर        विठ्ठलराव शिंदे-सोलापूर        अंबालिका-अहमदनगर(लाख टन)            (१७.६३ )            (१७.४४)            (१३.६४)साखर उत्पादन            जवाहर (२२.४७)            विठ्ठलराव शिंदे (१९.२६)        सह्याद्री-सातारा (१६.३१)साखर उतारा (टक्का)        गुरुदत्त-कोल्हापूर (१३.४१)        दालमिया-कोल्हापूर (१३.२१)     जयवंत-सातारा (१३)       सर्वाधिक गाळप दिवस        विघ्नहर-पुणे (१९५)        सह्याद्री-सातारा (१७५)        सोमेश्वर-पुणे (१७१)

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती