प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २३ - मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर यांची आज (२३ सप्टेंबर) जयंती. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायन शास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत.
नाट्यक्षेत्रातील कारकीर्द
इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले . मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले. पीडीएतून लागू, तसेच जब्बार पटेल, सतीश आळेकर मोहन आगाशे इत्यादी मंडळी बाहेर पडली.
६ नोव्हेंबर १९८७ साली त्यांचे निधन झाले.
सौजन्य : मराठी विकिपीडिया