शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दोन कोटी नव्हे, तब्बल १,१६० कोटींचा नफा

By admin | Published: April 12, 2016 3:04 AM

महाराष्ट्र सदन इमारत बांधकामाचा खर्च २००६ मध्ये २०५ कोटी रुपये आणि त्याच्या विकासकाला (डेव्हलपर) फक्त दोन कोटी रुपयेच (१.३३ टक्के) नफा मिळेल, असे पायाभूत विभागाच्या उपसमितीसमोर

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमहाराष्ट्र सदन इमारत बांधकामाचा खर्च २००६ मध्ये २०५ कोटी रुपये आणि त्याच्या विकासकाला (डेव्हलपर) फक्त दोन कोटी रुपयेच (१.३३ टक्के) नफा मिळेल, असे पायाभूत विभागाच्या उपसमितीसमोर सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात के. एस. चमणकर इंटरप्रायजेसने विक्रीयोग्य जमिनीपैकी २७ टक्के भाग विकून तब्बल १,१६०.९९ कोटी रुपये नफा कमावला होता. २०११ मध्ये ही जमीन चमणकर इंटरप्रायजेसला दिली गेली होती. ही माहिती एल अँड टी एशियन रियल्टी प्रोजेक्ट, एलएलपीचे प्रकल्प प्रमुख सुधीर कुलकर्णी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या निवेदनात दिली आहे. हे निवेदन आरोपपत्राचा भाग बनविण्यात आले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की एल अँड टीने हा प्रकल्प चमणकर्स आणि प्राईम डेव्हलपर्स यांच्याकडून आपल्याकडे घ्यायच्या आधी त्याचे मूल्यांकन करण्याचे काम कुशमॅन अँड वेकफिल्डकडे दिले होते. कंपनीला या प्रकल्पातून करपूर्व नफा ८५० कोटी रुपये होईल, असे म्हटले होते. याच प्रकल्पाचा स्टेटस रिपोर्ट समितीला सादर करण्यात आला असून तोदेखील आता आरोपपत्राचा भाग करण्यात आला आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की विकासकाला या प्रकल्पाचा खर्च २०५.५१ कोटी रुपये येणार असून मोबदल्यात देण्यात आलेल्या जमिनीच्या विक्रीतून २०७.९० कोटी रुपये मिळतील याचा अर्थ प्रत्यक्षात नफा केवळ १.३३ टक्केच असेल.कुलकर्णी यांनी ५ फेब्रुवारी २०१६ रोजी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रकल्पांतर्गत विक्रीयोग्य एरिया २५.७० लाख चौ.फू. होता आणि एकूण महसूलाची विभागणी के. एस. चमणकर इंटरप्रायजेस २७ टक्के, प्राईम बिल्डर्स ४.४ टक्के आणि एल अँड टी ६८.६ टक्के अशी झाली होती. कुलकर्णी म्हणाले की ४३०० कोटी रुपयांच्या महसुलात एल अँड टी एलएलपीचा भाग २,९५० कोटी रुपयांचा होता आणि एल अँड टीला येणारा खर्च २,१०० कोटी रुपये अपेक्षित होता.२०११ मध्ये त्रिपक्षीय करार करण्यापूर्वी एल अँड टीने कुशमॅन अँड वेकफिल्डला प्रकल्पाच्या मूल्यांकनाचे काम दिले होते. त्यांचा निष्कर्ष प्रत्येक चौरस फुटाची विक्री किमत १६,७३१.५१ रुपये असा निघाला. सुधीर कुलकर्णी पुढे म्हणाले की एल अँड टीने ८५ टक्के लोडिंग फॅक्टर गृहीत धरला होता आणि त्यानुसार कराराप्रमाणे मेसर्स के. एस. चमणकर इंटरप्रायजेसला विक्रीयोग्य एरियापैकी ६९३९०० चौरस फूट द्यायचे होते. त्यातून त्यांना एक रुपयाचाही खर्च न करता १,१६०.९९ कोटी रुपये मिळाले.प्रकल्पात एल अँड टीने किती पैसे अदा केलेके. एस. चमणकर इंटरप्रायजेस - रुपये : १२३,१०,००,०००मे. प्राईम बिल्डर्स - रुपये : ३५४,९१,००,२९१झोपडपट्टीवासीयांना - रुपये : ३९,६०,९०२एकूण रुपये - ४७८,४०,६११९३मूल्यांकनात प्रत्येक चौरस फुटाची विक्री किमत १६,७३१.५१ रुपये असा निष्कर्ष निघाला. एल अँड टीने ८५ टक्के लोडिंग फॅक्टर गृहीत धरला होता आणि त्यानुसार कराराप्रमाणे मेसर्स के. एस. चमणकर इंटरप्रायजेसला विक्रीयोग्य एरियातून १,१६०.९९ कोटी रुपये मिळाले.